आपल्या अभिनयातील सहजतेने, लूक्सने अभिनेता अमीर खानने कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अनेक दमदार आणि हिट चित्रपट देऊन बॉलीवूड मध्ये आमिरने त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. सत्यमेव जयते सारख्या शो मुळे आमिरची सामाजिक बाजू प्रेक्षकांच्या निदर्शनास आली.याच सोबत स्पष्टवक्तेपणामुळे देखील आमिर बऱ्याचदा चर्चेत असतो. अनेकदा काही वक्तव्यांमुळे वादाच्या विळख्यात देखील आमिर अडकला आहे.(Amir Khan New Controversy)
मागचा काही काळ आमिर साठी बराच कठीण होता. त्याने आधी केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्याचा ‘लालसिंग चड्ढा ‘ हा चित्रपट बॉयकॉट करण्यात आला. आमिर साठी हा मोठा धक्का होता. त्या नंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. सध्या तो चित्रपटाची निर्मिती करण्यावर आपले लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळतो आहे. लवकरच आमिर ‘चॅम्पपिअन्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्याची शक्यता आहे.या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा आमिर सांभाळत असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे.
पाहा काय आहे अभिनेत्याचं ट्विट ? (Amir Khan New Controversy)
परंतु या चित्रपटविषयी एक नवीन बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आधी आमिरने सलमान खानला विचारले होते पंरतु त्याने या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या नवीन प्रोजेक्ट्स मध्ये सलमान व्यस्त असल्याने त्याने हा चित्रपट नाकारला आहे, असं प्रथमदर्शनी म्हंटल जात आहे. सलमानने चित्रपट नाकारल्या नंतर आता आमिरने या चित्रपटासाठी अभिनेता रणबीर कपूर कडे विचारण्या केल्याच्या चर्चना उधाण आले आहे. रणबीर कपूरने अदयाप तरी याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. रणबीर कपूरने ही ऑफर स्वीकारली तर आमिर खान च्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरला बघणं रंजक ठरेल
हे देखील वाचा : अभिनेता नसिरुद्दीन शाहांनी केरला स्टोरी बदल बोलताना साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

या परिस्थितीविषयी प्रसिद्ध अभिनेता कमाल आर खान एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे, केआरके ने त्याच्या ट्विट मध्ये म्हंटल आहे, आधी आमिर खानने एका प्रसिद्ध अभिनेत्या ‘चॅम्पपिअन्स’ मध्ये काम करण्याची ऑफर दिली त्याने ती नाकारल्यावर आता आमिरने रणबीर कपूरला या चित्रपटात काम करण्याची विनंती केली आहे.यावरून हे सिद्ध होत की, आमिर खान मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे, कारण त्याला माहित आहे की, रणबीर कपूर त्याच्या चित्रपटात काम करायला का तयार होईल. केआरके च्या या ट्विटला नेटकाऱ्यानी चांगलच उचलून धरलं आहे.(Amir Khan New Controversy)