मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. अर्जुन व मलायका यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं समोर आलं आहे. दोघेही गेल्या आठ वर्षांपासून एकत्र होते मात्र या काळात त्यांचे दोनदा ब्रेकअप झाले. अशातच ते आता एकत्र नसल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी असाही दावा करण्यात येत आहे की, दोघेही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छित होते त्यामुळे ते एकत्रही आले. मात्र आता ते पुन्हा वेगळे झाल्याचा दावा वृत्तांमध्ये केला जात आहे. (malaika arora and arjun kapoor breakup)
मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांनी संगमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे ‘पिंकविला’ने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. त्यांचा प्रवास एवढाच होता, त्यामुळे आता तो सन्मानाने संपवत आहेत. एका सूत्राने सांगितले की, मलायका व अर्जुनचे नाते खूप खास होते. दोघांच्याही हृदयात एकमेकांसाठी खास स्थान आहे आणि ते कायम राहील.
याबाबत दोघेही मौन बाळगणार असल्याचेही सूत्राकडून सांगितले आहे. कारण लोकांना याबद्दल थोडेसे गॉसिप मिळावे आणि त्यांचे नाते बिघडावे किंवा त्यावर टिप्पणी करावी असे त्यांना वाटत नाही. सूत्राने पुढे सांगितले की, त्यांचे नाते खूप जुने आहे. पण आता ते संपत चालले आहे. पण दोघांमध्ये एकमेकांबद्दल राग नाही. ते एकमेकांचा मनापासून आदर करतात. आणि नेहमी एकमेकांसाठी उभे राहतील. लोकांनी त्यांच्या नात्याबद्दल त्यांना प्रायव्हसी द्यावी अशीही ते अपेक्षा करतात.
दोघांचे दोन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याची बातमीही चर्चेत आली होती. पण हे नातं संपवण्याऐवजी त्यांनी त्यावर काम करायचं ठरवलं होतं. त्याचवेळी अरबाजच्या लग्नानंतर लोकांच्या नजरा या अभिनेत्रीवर खिळल्या होत्या की, ती याच वर्षी लग्न करणार आहे. पण असं न घडता आता अर्जुन व मलायका वेगळे झाले आहेत.