अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी सोशल मीडियाद्वारे मजेशीर अंदाजात चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या जुळ्या मुलींचे व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असते. तसेच पती समीर वानखेडेंचे व त्यांच्या कामाबद्दल माहिती देणारे फोटो-व्हिडिओदेखील ती शेअर करत असते. नुकतंच दिवाळीनिमित्त ती तिच्या सासरी वाशीमला गेल्याचा एक छान व्हिडीओदेखील तिने चाहत्यांबरोबर शेअर केला होता. (Actress Kranti Redkar Shared Video On Instagram)
अशातच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. क्रांती व समीर यांनी त्यांची यंदाची भाऊबीज अकोला मधील श्री संत गजानन महाराज पादुका संस्थानच्या अनाथ मुलींबरोबर साजरी केली. त्याचेच काही खास क्षण क्रांतीने या व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. त्याचबरोबर समीर यांनीदेखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा – रजनीकांत यांच्या नातवाला सुपरबाईक चालवणं पडलं महाग, नियमांचं उल्लंघन केल्याने चेन्नई पोलिसांनी ठोठावला दंड
हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “श्री गजानन महाराज पादुका संस्थानच्या मुलींबरोबर यंदाची भाऊबीज साजरी करणे हा खूप भावनिक अनुभव होता. ज्या मुलींना कोणी नाही त्यांचा भाऊ बनणे आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासाठी कायम उभं राहण्याची ही एक जबाबदारीदेखील आहे.” त्याचबरोबर समीर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. “श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव, अकोला संचालित अनाथाश्रमात भाऊबीज साजरी करण्याचे भाग्य लाभले. या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी हे कमीच आहे” असं म्हणत त्यांनी हे खास क्षण शेअर केले आहेत.
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर समीर-क्रांतीच्या या अनोख्या व समाजभान जपणाऱ्या अनोख्या कृतीमुळे नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.