शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अखेर स्वप्न सत्यात उतरलं!, केतकी माटेगावकारने कमी वयात मुंबईत घेतलं तिचं ‘हॅप्पी प्लेस’, आकर्षक वस्तू, रंगसंगतीने केली सजावट

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 27, 2023 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress ketaki mategaonkar talked about her new home story in its majja special show gharachi goshta

Video : अखेर स्वप्न सत्यात उतरलं!, केतकी माटेगावकारने कमी वयात मुंबईत घेतलं तिचं 'हॅप्पी प्लेस', आकर्षक वस्तू, रंगसंगतीने केली सजावट

मुंबईत स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हीचंदेखील मुंबईत स्वत:चं घर घेण्याचे स्वप्न होतं आणि तिचं हे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. अभिनेत्रीने नुकतच तिच्या स्वत:च्या हिंमतीवर मुंबईत घर घेतलं असून नुकतीच ती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’मध्ये केतकीने तिच्या नवीन घराची खास झलक दाखवली. यावेळी तिने तिच्या घराचे काही किस्से प्रेक्षकांना सांगितले.

उंच आणि शांत ठिकाणी घर असावं या हेतूने केतकीने मुंबईत १९ व्या मजल्यावर तिचं स्वत:चं घर घेतलं आहे. या घराच्या इंटिरिअरसाठी तिने पांढऱ्या सांगायची थीम वापरली आहे. त्याचबरोबर या थीमला साजेशी रंगसंगती वापरत तिने तिच्या घराला रंगकाम केले आहे. ती निसर्गप्रेमी आहे. तिला झाडं, पानं, फुलं खूप आवडतात आणि त्यामुळेच घरातील हॉलच्या भिंतीला तशाच प्रकारचं वॉलपेपर लावलं आहे. त्याचबरोबर केतकी ही संगीतप्रेमी आहे, त्यामुळे तिच्या घरी वीणा, तंबोरा, पियानो सारखी अनेक वाद्य आहेत. या वाद्यांचा योग्य वापर करत तिने घरचे इंटिरिअर साकारले आहे. तिच्या घरी एक मोठा पिआनो असून तिने तो हॉलमध्ये आकर्षक पद्धतीने ठेवला आहे.


आणखी वाचा – फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन यांनी घेतला होता मुंबई सोडण्याचा निर्णय, मात्र मनोज कुमार यांनी सावरले होतं त्यांचं करिअर

तसेच घरात काही इतर गोष्टींची योग्य पद्धतीने सजावट करत घराला आकर्षक रूप दिले आहे. केतकी तिच्या घराला ‘हॅप्पी प्लेस’ अर्थात ‘आनंदी जागा’ असं म्हणते. तिच्या घराच्या दारावर एक हटके पाटी देखील आहे. ज्यावर ‘house is not a home without a beagle’ असं लिहिलं आहे. त्याचबरोबर तिला कुत्र्यांची विशेष आवड असल्याने तिने तिच्या पेटसाठी घरात खास जागा केली आहे.

आणखी वाचा – केतकी माटेगांवकरला तिच्या मुंबईतील घरी एकटं राहण्यास आई-वडिलांचा होता विरोध, म्हणाली, “आम्हाला सोडून…”

दरम्यान अनेकदा कामानिमित्त केतकीला मुंबईला यावे लागत होते. तेव्हा त्यांनी गोरेगावला घर घेतलं होतं. तो विकून २ बीएचकेचा फ्लॅट घेण्याचा तिच्या आईचा विचार होता. मग १८ व्या मजल्यावर केतकीच्या बाबांनी फ्लॅट बुक केल्यानंतर तिथेच १९ मजल्यावर केतकीने तिच्या हिमतीवर स्वतःचे घर घेतले. दरम्यान, २०२२ मध्ये हे नवीन घर घेताच काही दिवसांनी तिला ‘मीरा’ हा चित्रपट ऑफर झाला. त्याचबरोबर काही नवीन कामेदेखील तिला मिळाले. त्यामुळे या हे नवीन घर तिच्यासाठी भाग्यवान असल्याची भावना तिने व्यक्त केली.

Tags: entertainment newsketaki mategaonkarmarathi actressmarathi entertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Namrata Sambherao Fan Moment

"माझ्या हृदयाला होल…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने शेअर केली फॅन मुमेंट, म्हणाली, "आज तो या जगात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.