बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…” कविता लाड-मेढेकर यांनी सांगितला खऱ्या आयुष्यातील लग्नाचा किस्सा, म्हणाल्या, “माझ्या घरी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 27, 2023 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kavita Lad-Medhekar share a her Real-life Wedding Memories

"हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम..." कविता लाड-मेढेकर यांनी सांगितला खऱ्या आयुष्यातील लग्नाचा किस्सा, म्हणाल्या, "माझ्या घरी..."

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. मालिकेतील अनेक नायक-नायिकांच्या लग्नाची धूम सुरु आहे. अशातच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्या लग्नाची धुमधाम सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकणारी ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी या जोडीचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता अक्षरा-अधिपतीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. (Kavita Lad-Medhekar share a her Real-life Wedding Memories)

अक्षरा-अधिपतीच्या लग्नाची धूम प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे भाग दाखवले जात आहे. त्याचे अनेक प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. मालिकेतील अक्षरा व अधिपतीच्या भूमिकेला प्रेक्षकांचे जितकं प्रेम मिळतंय, तितकंच प्रेम भुवनेश्वरीच्या भूमिकेलाही मिळत आहे. यानिमित्त मालिकेत भुवनेश्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाचा एक किस्सा शेअर केला.

हे देखील वाचा – “कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच…”, सोनाली कुलकर्णीने हास्यविर समीर चौघुलेला भेटवस्तू देत केलं कौतुक, म्हणाली, “ज्या क्षणी…”

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

मालिकेत नुकतंच अक्षरा व अधिपतीच्या हळदीच्या भागाचं शूटिंग झालं. त्यानिमित्त कविता लाड-मेढेकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या खऱ्या लग्नातील हळदीचा एका किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “माझ्या लग्नाला २१ वर्ष झाली. त्यावेळी अशी मोठमोठी लग्न करण्याची पद्धतही नव्हती. हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम मोठ्या स्वरुपात करण्याचा ट्रेंड नव्हता. जरी असता तरी त्या ट्रेंडमध्ये मी कितपत सहभाग घेतला असता ते माहित नाही. कारण मुळात मला साध्या सोप्प्या गोष्टी आवडतात. साधं, सोप्प, घरगुती कमी लोकांमध्ये असे समारंभ करायला मला जास्त आवडतात.”

हे देखील वाचा – “गणपतीसमोर उड्या मारताना वयाचा विसर पडतो का?”, निळु फुलेंच्या लेकीने नक्की कोणत्या कलाकारांना सुनावलं?, म्हणाली, “वडेचाळे करण्यामागे…”

“माझ्या घरी हळदीचा कार्यक्रम झाला होता. आमची एकत्र हळद नव्हती, नवऱ्या मुलाची उष्टी हळद आली होती. सगळे नातेवाईक आले होते. चांगला स्वयंपाक केला होता. लग्नातले सगळे समारंभ झाले होते, पण ते घरगुती पद्धतीने झाले होते.”, असे कविता लाड म्हणाल्या. लवकरच मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचं लग्न पार पडणार असून हे लग्न निर्विघ्न पार पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: akshara adhipatibhuvaneshwarikavita medhekartula shikvin changlach dhadazee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Gauri Kulkarni Clarification On Engagement

'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीच्या 'त्या' फोटोमागील गुपित अखेर उलगडलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, "साखरपुडा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.