बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाली कुलकर्णीने ‘ती’ मुर्ती देऊन समीर चौघुलेंचा केला सन्मान, म्हणाली, “ज्या क्षणी माझ्या हातात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2023 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Samir Choughule On Sonali Kulkarni

"कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच…", सोनाली कुलकर्णीने हास्यविर समीर चौघुलेला भेटवस्तू देत केलं कौतुक, म्हणाली, "ज्या क्षणी…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कित्येकांना हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय करमतही नाही. या कार्यक्रमाच्या प्रत्येक स्किटने प्रेक्षकांना बांधून ठेवलं आहे. तितकंच या कार्यक्रमातील कलाकारांनीही कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांवर चाहते प्रचंड प्रेम करतात. सर्व सामान्य प्रेक्षकवर्गच नव्हे तर कलाकार मंडळी, राजकीय क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाचे चाहते आहेत. अनेक कलाकार मंडळीही हास्यजत्रेतील कलाकारांबद्दल भरभरून बोलताना दिसतात. (Samir Choughule On Sonali Kulkarni)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील प्रमुख हास्यविरांच्या यादीतील एक नाव म्हणजे समीर चौघुले. आजवर समीरने त्याच्या विनोदी शैलीने त्याचा खूप मोठा असा फॅन फॉलोविंग तयार केला आहे. समीरच्या चाहत्यांच्या यादीत कलाकारांची खूप मोठी लिस्ट आहे. यांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही मागे राहिलेली नाही. सोनाली कुलकर्णीने समीरला भेटवस्तू देत त्यांचं कौतुक केलं असल्याची पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. दरम्यान समीरला सोनाली कुलकर्णी भेटवस्तू देत असतानाच फोटोही त्याने पोस्ट केला आहे.

समीरने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “कलाक्षेत्रात एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे अत्यंत हृदयापासून खुल्या दिलाने कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच. माझ्या २९ वर्षाच्या कारकिर्दीत मी सहकलाकारांनी माझ्यावर केलेले निस्सीम प्रेमही अनुभवले आणि ईर्षा, जेलसी, इनसिक्युरिटी हे प्रकारसुद्धा अगदी जवळून बघितले, अनुभवले. आपल्याला इतरांच्या यशाचा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या यशाचा इतरांना होतो का? हा प्रश्न बरेचदा मला पडायचा. आपल्या जवळचे अनेक जण सोशल मीडियावर आपल्याबद्दल खूप वेगळे रिऍक्ट होतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं खरं स्वरूप अत्यंत वेगळं असतं, पण शेवटी हे सगळ कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून मी ग्रेसफुली स्वीकारायला ही शिकलो. असे प्रकार कदाचित फक्त आमच्या कलाक्षेत्रापुरत मर्यादित नसावेत.”

आणखी वाचा – “गणपतीसमोर उड्या मारताना वयाचा विसर पडतो का?”, निळु फुलेंच्या लेकीने नक्की कोणत्या कलाकारांना सुनावलं?, म्हणाली, “वडेचाळे करण्यामागे…”

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

“या पार्श्वभूमीवर सोनाली कुलकर्णीसारखे कलाकार असतात. देवाने ज्यांच्या शरीरात काळजाऐवजी नदीचे विशाल पात्र बसवलेले असते. सोनाली या आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रेमळ हास्यरसिक. आज माझ्या एका प्रहसनानंतर सोनाली कुलकर्णी यांनी माझ्या देवाची म्हणजेच ‘सर चार्ली चॅप्लिन’ यांची एक अत्यंत सुंदर मूर्ती देऊन माझा गौरव केला. ही अत्यंत सुंदर मूर्ती पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार देवधरसर यांनी घडवली आहे. (देवधरांनी घडवलेली ही चार्ली सरांची दुसरी मूर्ती माझ्या घरी आली. पहिली श्री.सुहास काळे वपु काळे यांचे सुपुत्र यांनी दिलेली स्नेहभेट होती) सोनाली यांना ही मूर्ती पेण येथील स्नेही श्री विनायक गोखले यांनी भेट दिली होती. पण सोनाली मला म्हणाली ” समीर, ज्या क्षणी ही मूर्ती माझ्या हातात आली त्या क्षणी मला तुझी आठवण आली. बरेच दिवस या मूर्तीचे वजन मला पेलवता येत नव्हते. आज ती योग्य हातात देताना मला खूप आनंद होतोय”. ही तिची वाक्य माझ्यासाठी मोठा आनंदाचा सोहळा होता”.

आणखी वाचा – “महाराष्ट्राचा अपमान…”, एल्विश यादवने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाची केली आरती, जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, “खालच्या स्तरावर जाऊन…”

“देवाने स्वर्गातून पृथ्वीवर शिंपडलेल्या पंचामृताचा थेंब होता. सोनाली कुलकर्णी सर्वोत्तम अभिनेत्री आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांचा हा स्वभाव या कलाक्षेत्रातील त्यांचे माणूसपण आणि वेगळेपण ठळकपणे दर्शवत. सोनाली कुलकर्णी तुझे खूप खूप आभार. मनापासून सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर यांचेही आभार. धन्यवाद सोनी मराठी. विशेष म्हणजे हा भाग जेव्हा चित्रित झाला, त्या दिवशी बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता. माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला. कायमचा.” असं म्हणत समीरने सोनाली कुलकर्णी यांचे आभार मानले आहेत.

Tags: entertainmentmaharashtrachi hasy jatramaharashtrachi hasya jatramhjsamir choughulesonali kulakarni
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Kavita Lad-Medhekar share a her Real-life Wedding Memories

"हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…" कविता लाड-मेढेकर यांनी सांगितला खऱ्या आयुष्यातील लग्नाचा किस्सा, म्हणाल्या, "माझ्या घरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.