बॉलिवूड चित्रपटांची सध्या चलती सुरु असताना अशातच ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवा करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५.५० कोटींची कमाई केली. अशा प्रकारे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केलेलं पाहायला मिळालं.(Vicky Kaushal Katrina Kaif)
सारा अली खान आणि विकी कौशल यांनी या चित्रपटाचं बरच प्रमोशन केलं. यापाठोपाठ आता विकी कौशलची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफही सुद्धा आपल्या पतीच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सोशल मीडियावर कतरिना कैफ हिने जरा हटके जरा बचके या चित्रपटाला घेऊन एक पोस्ट शेअर केली आहे.
पाहा पोस्ट शेअर करत काय म्हणाली कतरीना (Vicky Kaushal Katrina Kaif)
कतरिना ची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बघण्यासाठी कतरिनाने सर्वांना विनंती केली आहे. कतरिना कैफ म्हणाली की, ‘हा चित्रपट अत्यंत प्रेमाने तयार करण्यात आला आहे. आता विकी काैशल याने देखील कतरिना कैफ हिची ही पोस्ट रिशेअर करत लिहिले की, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए…’
कतरीना कैफ आणि विकी कौशल हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. विकी आणि कतरीना २०२१ साली राजस्थान येथे शाही विवाहबंधनात अडकले. कतरिना आणि विकी बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते मात्र त्यांच्यात अफेअर असल्याचं त्यांनी त्यांच्या लग्नाआधी कधीच मान्य केलं नाही.(Vicky Kaushal Katrina Kaif)
हे देखील वाचा – अबब! प्रभासच्या ट्रोल झालेल्या “आदिपुरुषची” प्रदर्शना आधीच ४०० कोटींची कमाई
जरा हटके जरा बचके चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी सारा अली खान आणि विकी कौशल हे उज्जैन येथील महाकाल मंदिरात गेले होते. तेथे गेल्याने सारा अली खानला नेटकऱ्यानी ट्रोल देखील केलं. यावर साराचा सहकलाकार विकी कौशल याने भाष्य करत नेटकर्यांना उत्तर देखील दिल.