बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून करीना कपूरचे नाव आवर्जून घेतले जाते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तिने केलेल्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अभिनेता सैफ अली खान बरोबर लग्न केल्यानंतर ती फार कमी चित्रपटांमध्ये दिसू लागली. आता तिचा ‘क्रू’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटामुळे सध्या करीना खूप चर्चेत आलेली दिसून येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशन करताना करीना एअरपोर्टवर स्पॉट झाली. तेव्हा तिच्याबरोबर तिचा पती सैफ, मुलगा तैमुर व जेहदेखील दिसून आले. यावेळचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला दिसून येत आहे. (kareena kapoor son jeh)
बुधवारी रात्री करीना आपल्या कुटुंबासहित सुट्टी घालवण्यासाठी निघाली होती. ती जात असतानाचे व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसून येत आहेत. पण यामध्ये करीनापेक्षा तिचा लहान मुलगा जेहनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा पुन्हा एकदा मस्ती करतानाचा व्हिडीओ सर्वांसमोर आल्याने त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.
एअरपोर्टवर जाताना करीनाने डेनिम जॅकेट घातले होते. त्यावर तिच्या आगामी चित्रपटाचे नावही दिसून आले. सैफने मध्यमांसमोर दाखवण्याचाही प्रयत्न केला. पण त्यानंतर लगेचच सर्वांचे लक्ष मागून येत असलेल्या जेहवर गेले आणि त्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.
सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जेहची नॅनी त्याला घेऊन येत असताना दिसली. कॅमेऱ्यासमोर येताच त्याने आपल्या डोक्यावर हात मारताना दिसला. अगदी मोठ्या माणसांप्रमाणे त्याने कृती केल्याने व्हायरल व्हिडीओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकाऱ्याने म्हंटले आहे की, “जेह व राहाला माध्यमांबरोबर काहीतरी वैयक्तिक राग आहे”, दुसरा नेटकरी लिहितो की, “नॅनीला खूप हसायला येत आहे पण ती आपले हसू दाबत आहे”, अजून एकाने लिहिले आहे की, “ही सर्व शिकवण करीनाची आहे”.
या चित्रपटामध्ये करीनाबरोबर अभिनेत्री तब्बू व कृती सेननदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट हवाईसुंदरींवर असून त्या सोन्याच्या तस्करी व फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत. हा चित्रपट २९ मार्चला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.