शुक्रवार, ऑगस्ट 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रीतम दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात होणार का यशस्वी?, ‘पारु’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार?, प्रोमोला प्रेक्षकांची पसंती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 21, 2024 | 12:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Serial Promo

प्रीतम दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात होणार का यशस्वी?, 'पारु' मालिकेमध्ये पुढे काय घडणार?, प्रोमोला प्रेक्षकांची पसंती

‘झी मराठी’ वाहिनी गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या वाहिनीने आजवर प्रेक्षकांची मन जपत त्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कमतरता भासू दिली नाही आहे. वेगवेगळे कथानक घेऊन येत ही वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच सज्ज असलेली पाहायला मिळते. अशातच ही वाहिनी सध्या रसिक प्रेक्षकांसाठी विविध कथानक घेऊन आली असून नवनवीन मालिका घेऊन आली आहे. ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका सध्या रसिक प्रेक्षकांसाठी ‘झी मराठी’ वाहिनी घेऊन आली आहे. (Zee Marathi Serial Promo)

या मालिकांना अल्पावधीतच उत्तम प्रतिसादही मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकांपैकी ‘पारू’ या मालिकेला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. साताऱ्यात सुरु असणाऱ्या या मालिकेचं सगळेचजण कौतुक करत आहेत. सुरुवातीला या मालिकेला काहींनी ट्रोल केलं मात्र त्यानंतर मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली असून मालिकेत दाखवण्यात आलेली सकारात्मकता सगळ्यांच्या पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम झील मेहता वर्षाअखेरीस उरकरणार लग्नसोहळा, सात नव्हे तर दोन फेरे घेणार अन्…; म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘पारू’ या मालिकेत प्रीतम हा तिच्या होणाऱ्या पत्नीचा म्हणजेच दिशाचा पर्दाफाश करणार आहे. बाहेर असलेल्या अफेअरच सत्य तो अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्यासमोर आणणार आहे, असा प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांना अतिशय आनंद झाला असून मालिकेत चांगलं घडताना दाखवल्याने अनेकांनी कौतुक केलं आहे. तर नव्या मालिका येताच जुन्या मालिकांचे प्रोमो टाकणं कमी केल्याने नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली प्रियांका चोप्रा, लेक आयोध्या म्हणून ओरडू लागली अन्…; नवऱ्याच्या कपाळीही टिळा, व्हिडीओ व्हायरल

तर काहींनी हा प्रोमो पाहून “हे प्रीतमने पाहिलेलं स्वप्न असेल का?”, “असा प्रोमो दाखवून इतक्या लवकर सत्य समोर येणार नाही, दिशाभूल आहे”, असंही म्हटलं आहे. आता नेमकं मालिकेत काय होणार?, प्रीतम दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? हे पाहणं साऱ्यांना रंजक ठरणार आहे.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialzee marathiZee Marathi Serial Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pradeep Rawat passing
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे ७४व्या वर्षी निधन, सलमान खानही भावुक, म्हणाला, “अनेक चांगले…”

ऑगस्ट 6, 2026 | 10:53 am
dipika kakar ibrahim emotional
Entertainment

कॅन्सरच्या उपचारादरम्यान भावुक झाली अभिनेत्री, हॉस्पिटलमध्येच रडू लागली, म्हणाली, “माझं शरीर…”

ऑगस्ट 4, 2026 | 10:03 am
Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Next Post
Swatantra Veer Savarkar Movie

'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये सचिन पिळगांवकर नव्हे तर 'हा' अभिनेता साकारणार सुभाषचंद्र बोस यांची भूमिका, पोस्टरमधून सत्य आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.