बॉलिवूड अभिनेत्री काजोल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या फोटोशूटमुळे, तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. काजोलचा ‘दो पत्ती’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असून विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच, काजोलची लेक न्यासा देवगण देखील आईप्रमाणे बरीच चर्चेत असून तिच्या पोस्ट अनेकांचे लक्ष वेधताना दिसते. अशात या माय-लेकी सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे जोरदार चर्चेत आल्या आहेत. (kajol share a post about her daughter)
काजोलने नुकतंच तिच्या लेकीसाठी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर न्यासाने दिलेलं उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काजोलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लेकीबद्दल एक किस्सा शेअर केला आहे. अभिनेत्री या पोस्टमध्ये म्हणाली, “मी माझ्या मुलीला तिचा दृष्टिकोन सुधारण्यास सांगितलं. त्यावर ती मला माझ्या याबद्दलच्या तक्रारीसाठी तुम्हाला माझ्या निर्मात्यांशी (आई-बाबांशी) संपर्क साधावा लागण्याचं सांगितलं. न्यासाच्या या उत्तरावर ती ‘चांगली खेळलीस तू.’, असं म्हणाली.
हे देखील वाचा – दोन घरांनंतरही मुंबईत प्रसाद खांडेकरने तिसरं घर का खरेदी केलं?, म्हणाला, “सकाळी उठल्यावर…”
दरम्यान, काजोलने याआधी ‘इंस्टंट बॉलीवुड’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लेकीचा एक किस्सा शेअर केला. ती यात म्हणाली होती की, “एकदा मी न्यासावर खूपच नाराज झाले होते. ते तेव्हा मी तिला म्हणालो, ‘मी देवाकडे अशी प्रार्थना करते की तुलाही माझ्यासारखी मुलगी मिळावी.’. त्यावर ती बोलते, ‘नाही. मी मुलाला जन्म देईन. माझ्यासारख्या मुलीला मी सांभाळू शकत नाही.'”
हे देखील वाचा – वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी सुप्रसिद्ध के-पॉप गायिकेचं निधन, धक्कादायक माहिती समोर

काजोल गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीपासून दूर होती. त्यानंतर ओटीटीद्वारे ती या क्षेत्रात पुन्हा परतली. ‘द ट्रायल’, ‘लस्ट स्टोरीज २’ यांसारख्या वेबसीरिजमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. लवकरच ती ‘दो पत्ती’ चित्रपटात झळकणार असून ज्यात तिच्यासह अभिनेत्री क्रिती सेनन देखील दिसणार आहे. तसेच न्यासाही तिच्या आईप्रमाणे सोशल मीडियावर जोरदार सक्रिय आहे. तिच्या फोटोशूटची नेहमीच चर्चा होत असते.