Girija Oak National Crush : मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री गिरीजा ओक नॅशनल क्रश म्हणून नावारूपास आली. तिच्या निळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमधील तिच्या फोटोंनी सर्वांमध्ये उत्सुकता वाढवली. एका हिंदी युट्युब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीच्या या क्लिपने तिच्या आकर्षक आणि उत्स्फूर्त शैलीने लोकांना आश्चर्यचकित केले. सोशल मीडियावर कोणीही एका रात्रीत सेन्सेशन बनू शकते आणि अशातच अभिनेत्री गिरिजा ओक ही “न्यू नॅशनल क्रश” होताना दिसतेय. चाहत्यांनी गिरीजाला भरभरुन प्रेम दिलं. इतकंच नाहीतर गिरीजानेही इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचे आभार मानले. आता नॅशनल क्रश या विषयावर गिरीजाने पुन्हा एकदा आपलं मत मांडलं आहे.
गिरीजाने नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “मी हल्लीच एका पेजवर पाहिलं. बऱ्याच मराठी अभिनेत्रींना असं विचारण्यात आलं की, तुम्हाला कोणाकडून काय चोरावंसं वाटेल? त्यापैकी बहुतेक जणींनी गिरीजा ओककडून म्हणजेच माझ्याकडून माझं ‘नॅशनल क्रश’चं टायटल चोरावंसं वाटेल असं उत्तर दिलं. तर, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. मी तर म्हणेन प्लीज चोरा, प्लीज घेऊन जा… हा खूप छान अनुभव आहे”.
आणखी वाचा – दयाबेनला पितृशोक, ८४ व्या वर्षी नाटककार भीम वाकाणी यांचे निधन, लेकीवर होता खूप जीव
पुढे ती म्हणाली, “नॅशनल क्रश झाल्यावर अर्थात खूप मजा येते… खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात… अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात. पण, मी याआधी सुद्धा सांगितलं आहे आणि माझ्या एका लेखातही मी म्हटलं होतं की, याला प्रसिद्धीची लाट म्हणतात. खरंच ही प्रसिद्धी एका लाटेसारखीच असते ती येते… आणि मग ती लाट जाते सुद्धा! त्यामुळे आपण या गोष्टीची देखील तयारी ठेवली पाहिजे की, ही लोकप्रियता जशी आलीये. तशी ती कधीतरी ओसरणार सुद्धा आहे. त्यानंतर मग पुन्हा तुमचं नॉर्मल आयुष्य सुरु होईल”, असं मत गिरिजाने व्यक्त केलं.
आणखी वाचा – प्रेग्नेंसीबाबत आरती सिंगचा मोठा निर्णय, गरोदर नाहीतर घेणार मूल दत्तक, कारण सांगत म्हणाली…
मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील गिरिजानं आजवर काम केल आहे. ती अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची लेक आहे. गिरिजा प्रत्यक्षात मराठी, हिंदी आणि कन्नड प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. ‘तारे जमीन पर’ (2007) आणि ‘शोर इन द सिटी’ (2010) या बॉलीवूड हिट चित्रपटांव्यतिरिक्त, तिने ‘जवान’ (2023) मध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘इंस्पेक्टर झेंडे’ या चित्रपटातही गिरिजा ओकने काम केले आहे. यामध्ये तिने मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.





