शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पारंपरिक लूक, लेकांना उटणं लावलं अन्…; देशमुखांच्या सूनेचे संस्कार पाहून चाहतेही भारावले, जिनिलीयाचा दिवाळी पहाटचा व्हिडीओ चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2023 | 12:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh Diwali Video

Video : पारंपरिक लूक, लेकांना उटणं लावलं अन्...; देशमुखांच्या सूनेचे संस्कार पाहून चाहतेही भारावले, जिनिलीयाचा दिवाळी पहाटचा व्हिडीओ चर्चेत

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीच्या यादीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची नाव अग्रस्थानी आहेत. महाराष्ट्राचे दादा वाहिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. रितेश आणि जिनिलीयाची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना विशेष भावते. रितेश-जिनिलीयाचे एकत्र केलेले फोटोशूटचीही विशेष चर्चा रंगलेली असते. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या प्रेमाचं बरेचदा उदाहरणही दिलं जातं. (Genelia Deshmukh Diwali Video)

सिनेसृष्टीत रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्यावरील संस्कारांचे प्रत्येकवेळी सर्वत्र कौतुक होते. रियान व राहील अशी त्यांना दोन मुलं आहेत. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्ष अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत संसाराकडे विशेष लक्ष दिलं. जिनिलीयाला मराठी संस्कृतीची आवड असलेली एखाद्या सणानिमित्त तिने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओवरून कळतं. त्यामुळेच महाराष्ट्राची सून म्हणून ही तिला ओळखलं जातं.

आणखी वाचा – Jhimma 2 Trailer : लक्षवेधी संवाद, धमाल कॉमेडी अन्…; ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, निर्मिती सावंत भलत्याच भाव खाऊन गेल्या आणि…

जिनिलीयाने दिवाळी सणानिमित्त शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये देशमुखांच्या घरच्या दिवाळीची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दिवाळीनिमित्त जिनिलीयाने दोन्ही मुलांना अभ्यंगस्नान घालताना दिसत आहे. जिनिलीया या व्हिडीओमध्ये रियान व राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे. शिवाय या व्हिडिओला कॅप्शन देत, “दिवाळी सकाळ, मराठी मुलगी, देशमुख परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia❤️Ritesh (@geneliaa_d)

आणखी वाचा – Video : नारकारांच्या घरी असं होतं लक्ष्मीपूजन, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला पूजेचा संपूर्ण व्हिडीओ, परंपरा जपली अन्…

जिनिलीयाने दोन्ही लेकांना अभ्यंगस्नान घालतानाच व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीया व रितेश यांच्या दोन्ही मुलं ही आई वडिलांपाठोपाठ चर्चेत असतात. मीडियासमोर ते नेहमीच हात जोडून नमस्कार करत त्यांना पोज देतात, यामुळे आई वडिलांनी केलेल्या संस्कारांचंही वेळोवेळी नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात. मुलांच्या संगोपनासाठी जिनिलीयाने तब्बल जवळपास १० वर्ष चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता.

Tags: entertainmentgenelia deshmukhGenelia Deshmukh Diwali Videogenelia deshmukh on childmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
prajakta Kulkarni dighe bought a new luxurious car

‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली लाखो रुपयांची महागडी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आमच्या कुटुंबात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.