गुढीपाडव्यानिमित्त अनेक कलाकारांचे खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरले. काही कलाकारांनी तर साखरपुडा सोहळा उरकत वा नवी कोरी गाडी खरेदी करत यंदाचा गुडीपाढवा साजरा केला. अशातच एका कलाकार जोडीच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गौतमी देशपांडे विवाहबंधनात अडकली. लग्नानंतरचा गौतमीचा हा पहिलाच पाडवा आहे. पहिल्या पाडव्यानिमित्त गौतमीने नवऱ्याबरोबर शेअर केलेल्या खास फोटोने लक्ष वेधून घेतलं. (Gautami Deshpande Mangalsutra)
गुढीपाडव्यानिमित्त गौतमी व स्वानंदचा गुढीबरोबरचा खास लूक असलेला पारंपरिक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. गौतमी व स्वानंद यांनी २५ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. गौतमी व स्वानंद यांनी एका रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा उरकला. दोघांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांचं लग्न झालं. गौतमी व स्वानंदच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ बरेच चर्चेत राहिले.
आता गुढीपाडव्यानिमित्त गौतमी व स्वानंद यांनी खास मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौतमीच्या गळ्यातील मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गौतमीने अगदी नाजूक असं मंगळसूत्र परिधान केलं होत. या मंगळसूत्रात अधिकाधिक सोन्याची चैन व त्यात कमीतकमी काळे मणी दिसले. शिवाय या काळ्या मण्यांमध्ये असलेल्या मुहूर्तमणीने या मंगळसूत्राची शोभा अधिक वाढवली, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. गुढीपाडव्याच्या सणाला गौतमीने इतर कोणतेही दागिने न घालता नाजूक मंगळसूत्र परिधान करत साऱ्यांचं लक्ष वेधलं.
गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली लग्नाआधी दिली नाही. तरीदेखील दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. अखेर गौतमीने थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत स्वानंद बरोबरच्या नात्याचा खुलासा केला. त्यांनतर दोघांच्या संगीत, मेहंदी हळदी समारंभातील फोटोही चर्चेत राहिले. स्वानंद व गौतमी लग्नानंतर संसारात रमलेले दिसले. सोशल मीडियावरही दोघे बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते एकमेकांबरोबरचे रील व्हिडीओ शेअर करताना दिसतात.