हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. ‘भाभी’ फेम डॉलीने नुकतंच ‘परिणिती’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यावर साकारलेल्या पात्रांमुळे ती कायमच चर्चेत असते. मात्र सोशल मीडियावर शेअर डॉलीने केलेल्या एका पोस्टमुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. ती गेले काही दिवस कर्करोगाशी झुंज देत होती. याचबाबत तिने पहिल्यांदा खुलासा केला आहे. (Actress Dolly Sohi Shared Bald Look)
डॉलीने इंस्टाग्रामवर अकाऊंटद्वारे तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा लुक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचं पूर्ण टक्कल झालं आहे. निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांसाठी तसेच भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले. पुढे ती म्हणली, “या कठीण प्रवासात तुम्ही त्यातून जगणं निवडता? की त्या प्रवासाचा बळी निवडता? यावर सगळं अवलंबून आहे”. त्याचबरोबर या गंभीर आजाराविषयी डॉलीने सकारात्मक दृष्टिकोण ठेवत तिच्या चाहत्यांना कठीण काळातही खंबीरपणे लढण्याची आणि जगण्याची नवी उमेद दिली आहे असं म्हणायला हरकत नाही.
आणखी वाचा – दुबईत नाटकाचा प्रयोग करायला गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेला आला असा अनुभव, म्हणाला, “दिवाळीची सुरुवातच…”
दरम्यान डॉलीच्या आजारपणाविषयी सांगायचे झाले तर तिला सुरुवातीला काही लक्षणे दिसली आणि नंतर तिला कर्करोगाचे निदान झाले. तिला ६-७ महिन्यांपूर्वी काही लक्षणे दिसली होती, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा तिचा त्रास वाढला त्यावेळी ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली आणि काही चाचण्या करून घेतल्या. या चाचण्यानंतर गर्भाशय काढून टाकावं लागेल असं तिला सांगण्यात आलं. मग या चाचण्यानंतर तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. यानंतर तिने यावर उपचार घेणे सुरु केले असून सध्या तिची केमोथेरपी सुरू आहे.
आणखी वाचा – Video : आरती केली, नजर काढली अन्…; सासरी थाटामाटात पार पडलं अमृता देशमुखचं केळवण, घराचीही दिसली झलक
दरम्यान डॉलीने कर्करोगावर मात केली असून ती तिच्या अनेक चाहत्यांसाठी प्रेरणा बनली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवरदेखील तिच्या अनेक चाहत्यांनी तिला प्रतिक्रिया देत धीर दिला आहे. तसेच या आजारपणात खंबीर राहिल्याबद्दल तिचं कौतुकदेखील केलं आहे.