बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली ६ वर्षांपूर्वी एकमेकांसह विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर त्यांनी गोंडस अशा मुलीला जन्म दिला. तीच नाव त्यांनी वामिका असं ठेवलं. ही जोडी त्यांच्या कपल गोल्समुळे कायमच चर्चेत असते. आता देखील या दोघांच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विराट-अनु्ष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत. अर्थात याबद्दल दोघांनीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमुळे अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. (Actress Anushka Sharma Beby Bump Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये अनुष्का-विराट बाहेर फिरायला जाताना हातात हात घालून चालताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये विराट राखाडी रंगाच्या टीशर्ट आणि काळ्या रंगाच्या पॅंटमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्याने काळ्या रंगाची टोपी देखील घातली आहे. तर अनुष्का काळ्या रंगाच्या शॉर्ट बलून स्लीव्हजच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या ‘बेबीबंप’ने.
आणखी वाचा – कोकण हार्टेड गर्लबरोबर मलायका अरोरा मराठीत बोलली अन्…; ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाल्या, “मेले जळतात आणि…”
अनुष्काने तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीची गुडन्यूज खूप उशिराने दिली होती. त्यामुळे अनुष्का तिच्या आताच्या प्रेग्नन्सीबाबतही उशिराने सांगणार आहे का? अश्या चर्चा रंगताना दिसत आहेत. त्याचबरोबर हे कपल अनेकदा मॅटर्निटी क्लिनिकबाहेर स्पॉटदेखील झाले आहे. मात्र त्यावेळी त्यांनी पापाराझीला फोटो न काढण्यासाठी सांगितले होते.
विराट-अनुष्का यांना ‘वामिका’ नावाची एक मुलगी असून ती आता २ वर्षांची आहे. विराट-अनुष्का दोघे सोशल मीडियावर लेकीसोबतचा फोटो पोस्ट करत असतात. मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. पापाराझींनी अनेकदा वामिकाला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तेव्हा विराट-अनुष्काने त्यांना फोटो काढण्यासाठी सक्त मनाई केली.
आणखी वाचा – कागदाचे आकाश कंदील मिळत नसल्यानं प्रिया बापटची खंत, म्हणाली, “प्लास्टिकचे कंदील बघून…”
विराट-अनुष्का यांच्यातील स्पेशल बॉन्ड कायमच दिसून येतो. अनुष्का विराटला कायमच सपोर्ट करताना दिसते. नुकतंच विराटच्या वाढदिवशी त्याने केलेल्या दमदार कामगिरीनिमित्त अनुष्काने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान अनुष्का मनोरंजन विश्वात सध्या कुठेही दिसत नाही आहे. गेले काही दिवसांपासून ती सार्वजनिक ठिकाणी स्पॉटदेखील झाली नाही. तर विराट हा सध्या त्याच्या दमदार परफॉर्मन्समुळे क्रिकेटविश्वात खूपच चर्चेत आहे. विराट त्याच्या आगामी वर्ल्डकपसाठी देखील सज्ज झाला आहे.