शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंकिता लोखंडे व विकी जैनमधील वाद विकोपाला, एकमेकांवरच केले आरोप, अभिनेत्री म्हणते, “तुझं बोलणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 13, 2023 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress ankita lokhande and vicky jain marriage in trouble bigg boss 17 new promo release

Video : अंकिता लोखंडे व विकी जैनमधील वाद विकोपाला, एकमेकांवरच केले आरोप, अभिनेत्री म्हणते, “तुझं बोलणं...”

हिंदी टेलिव्हीजनवरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाला वादविवादांपासूनच सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन ही रिअल लाईफ जोडीदेखील सहभागी झाली. दरम्यान, या शोच्या पहिल्याच दिवसांपासून दोघांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेकदा दोघंही एकमेकांवर चिडताना दिसले. अशातच आता या जोडीचा आणखी एका भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता-विकी यांच्यातील भांडण पाहून प्रेक्षकही हैराण झाले आहेत. (Ankita Lokhande And Vicky Jain Big Boss 17)


‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांना रुम बदलण्याची संधी मिळते आणि विकी ‘दिमाग का मकान’मध्ये जातो. पण अंकिता मात्र ‘दिल के मकान’मध्ये एकटी राहणं पसंत करते. यावरून त्यांच्यात जोरदार भांडण होते. हे भांडण इतकं विकोपाला जातं की, अंकिता विकीला लाथ मारत “तू खरोखर स्वार्थी आहेस. मूर्ख आहेस” असं म्हणत “तुझ्यासोबत राहून माझं नशीब खरंच खराब झालं” असं म्हणते. यानंतर त्याच्यापासून दूर जात ती त्याला “आपण आता विवाहित आहोत हे विसरून जा. आजपासून तू वेगळा, मी वेगळा. तू माझा वापर केलास” असं रागाने म्हणते.

Promo #BiggBoss17, Ghar me hua tabadla, #AnkitaLokhande aur #VickyJain ka change house pic.twitter.com/EoiPnHV0tX

— The Khabri (@TheKhabriTweets) November 12, 2023

आणखी वाचा – आमिषा पटेलचं नाव घेताच करीना कपूरने फिरवलं तोंड, दोघींमध्ये वाद झाला अन्…; नेमकं प्रकरण काय?

यातच आता या शोचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अंकिता विकीला सांगते की, “तो सर्वांचे प्रश्न सोडवत आहे. सगळ्यांशी जाऊन बोलत आहे. पण तू स्वत:बद्दल बोलण्याचा एकदाही विचार केला नाहीस?” यावर विकी असं म्हणतो की, “मी असं करू शकत नाही. मी आता हरलो आहे” यावर अंकिता “नाही विकी, तू हरला नाहीस. पण तू ज्या पद्धतीने बोलत आहेस ते बरोबर आहे का? अशाप्रकारे गोष्टी सुटतील का?” असं म्हणते.

यावर विकी तिला, “मी हे नाते चांगले ठेवू शकत नाही. मी आपल्या नात्याचा अनादर करत आहे” असं उत्तर देतो. त्याच्या या उत्तरावर अंकिता “तू मला स्वतःपासून वेगळे करत आहेस का?” असं विचारते. “माझ्या या प्रश्न विचारण्याने तुझ्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित होतात” असंही ती त्याला म्हणते. यावर विकी अंकीताला म्हणतो, “मी प्रत्येक बाबतीत चुकीचा असतो. त्यामुळेच मी काही बोलत नाही” असं म्हणतो. दरम्यान अंकिता प्रतिउत्तर देते की, “नाही विकी… तू चुकीचा नसतो. प्रत्येकवेळी माझीच चूक असते”. विकीदेखील तिला उत्तर देताना असं म्हणतो की, “तू अंकिता लोखंडे आहेस. एक सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आहेस. त्यामुळे तू नेहमीच योग्य असतेस”.

आणखी वाचा – “मला फरक पडत नाही कारण…”, दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून कोणत्याच गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही प्रिया बापट, म्हणाली, “कोणत्याही सणाला…”

यानंतर अंकिता म्हणते की, “आपल्या नात्यात संतुलन साधावे लागेल”. पण ते विकीला जमणार नसल्याचे तो सांगतो. “आपल्यात तुलना होऊ शकत नाही. त्याचबरोबर तुझी वागणूक बदलण्यासाठी मी काहीही करू शकत नाही” असं म्हणत तो अंकिताला पति म्हणून समजून घेण्यासाठी सांगतो. त्यामुळे आता येत्या भागात सलमान अंकिता-विकीला काय बोलतो? अंकिता-विकी यांच्या नात्यात दुरावा येणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून ‘बिग बॉसच्या आगामी भागांसाठी प्रेक्षकदेखील आतुर आहेत.

Tags: ankita lokhandeBig boss 17vicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Next Post
Mrunal Thakur and Baadshah dating rumour

लग्नाच्या काही वर्षांतच घटस्फोट, लेकही आहे अन्…; रॅपर बादशाह चक्क मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट, ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.