सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. सुरुची-पियुष, प्रसाद-अमृता ही कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकली. तर स्वानंदी-आशिष, मुग्धा-प्रथमेश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. याशिवाय अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली. यांत आता आणखी एका अभिनेत्रीचा साखरपुडा उरकला असल्याचं समोर आलं आहे. (Sukanya Kalan Engagement)
आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री, नृत्यांगना सुकन्या काळण हिचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. अभिनेता कुशल बद्रिके व सुनैना बद्रिके यांनी सुकन्याच्या साखरपुडा सोहळयाला हजेरी लावली होती. कुशल व सुनैना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुकण्याच्या साखरपुडा सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो शेअर केले आहेत. सुकन्याच्या साखरपुडा सोहळयाला कुशल व सुनैना दोघांनीही हजेरी लावली होती.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेला नवं वळण, किल्लेदारांचं रहस्य उलगडणार? सायलीसमोर अपघाताचा फ्लॅशबॅक

सुकन्या नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. साखरपुड्यासाठी ही सुकण्याचा मॉडर्न अंदाज विशेष भावला. सुकन्याने रोशनसह साखरपुडा समारंभ उरकला आहे. आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सुकन्याचे साखरपुड्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. साखरपुड्यालाही सुकण्याने पतीसह ठेका धरलेला पाहायला मिळाला.
‘एकापेक्षा एक’ या शोनंतर सुकन्याने चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘मेनका उर्वशी’, ‘तु का पाटील’ या चित्रपटात झळकली होती. सुकन्याच्या बोल्ड फोटोशूटचीही खूप चर्चा रंगली होती. तिच्या न्यूड फोटोशूटनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होती. चित्रपटांबरोबरच तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘कन्यादान, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमधून तिने छोटा पडदा गाजवला होता.