शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या छोट्याशा टीव्हीवर…”, नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुख भावुक, म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 9, 2024 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Deshmukh On Zee Natya Gaurav Award

"आमच्या छोट्याशा टीव्हीवर...", नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुख भावुक, म्हणाली, "खऱ्या आयुष्यात..."

नुकताच झी मराठीचा ‘झी नाट्य गौरव’ सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या सोहळ्याला पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन कार्यक्रमाचे बरेच फोटो, व्हिडीओ पोस्ट केले. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -व्यावसायिक नाटक या कॅटेगिरीसाठी अवॉर्ड मिळाला. ही अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. (Amruta Deshmukh On Zee Natya Gaurav Award)

अमृताला नाटक विश्वासाठी एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. सध्या अमृता नाटकविश्वात रमलेली दिसत आहे. अमृताने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अमृता ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या अमृता तिच्या अभिनयाने रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नाटकांसाठी विविध ठिकाणी ती दौरेही करताना पाहायला मिळते. या नाटकविश्वातील अमृताची कामगिरी पाहता तिला झी नाट्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

आणखी वाचा – “डुकरासारखा खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम…”, सलमान खानबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “जेवढे खातो ते…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक फोटो शेअर करत अमृताने लिहिलं आहे की, “‘झी नाट्य गौरव’ हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याश्या टीव्हीवर उत्साहाने बघायचे.आणि तिथे असण्याची स्वप्नसुद्धा बघायचे. कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं. आता जेव्हा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक’ ची ट्रॉफी माझ्या हातात आली तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी वाटत नाही. ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव ‘नियम व अटी लागू’साठी त्यांना सुचवणारी कविता ताई यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा निव्वळ योगायोग”.

आणखी वाचा – दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने बायकोसह शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “खेळ मांडला…”

पुढे अमृता म्हणाली, “खरं सांगायचं तर हे दोघे स्टेजवर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की ‘छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाहीच, येत’, आणि म्हणूनच वाटतं ‘क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?'”, असं म्हणत तिने आनंद व्यक्त केला आहे. अमृताला हा पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या तिच्या नाटकासाठी मिळाला आहे.

Tags: amruta deshmukhAmruta Deshmukh On Zee Natya Gaurav Awardentertainmentmarathi actresszee natya gaurav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Darsheel Safary on Taare Zameen Par

'तारे जमीन पर'मधील ईशानला दातांमुळे सहन करावा लागला भयानक त्रास, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाला, "१ किमी दात बाहेर असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.