ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याचे वृत्त काही दिवसांपासून चर्चेत होते. बच्चन कुटुंबात वादविवाद सुरु असल्याचा चर्चा काही दिवसांपासून आहेत. अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता, ‘झूम’च्या वृत्तानुसार, ऐश्वर्या वेगळी राहत असल्याचं समोर आलं आहे. बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’मधून ती बाहेर पडली आहे. (Aishwarya Rai Bachchan Breaking News)
‘झूम’च्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबियांच्या जवळच्या नातेवाईकाकडून असे सांगण्यात आले की, “ऐश्वर्याला बच्चन कुटुंबातून बाहेर काढण्यात आले आहे आणि ती तिची आई वृंदा राय व अभिषेक बच्चन यांच्यासह वेगळी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘झूम’ने असा दावा केला आहे की, ऐश्वर्या व जया बच्चन यांचा एकमेकांसह संवाद नाही आणि यामुळे कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. अशातच श्वेता बच्चन या जलसामध्ये कायमस्वरूपी राहायला आल्यामुळे हे भांडण आणखी वाढलं असल्याचं समोर आलं आहे.
ऐश्वर्या बच्चन व बच्चन कुटुंबातील वाढ चिघळला असल्याचं समोर आलं आहे. यांत मात्र अभिषेक बच्चन याची तारांबळ उडाली आहे. अभिषेकला कुटुंबाप्रती एक मुलगा म्हणून त्याची जबाबदारी आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्याशी असलेली निष्ठा दाखवायची आहे. ‘झूम’च्या वृत्तानुसार, ऐश्वर्या व अभिषेक दोघेही भविष्यात घटस्फोट घेणार नसल्याचंही समोर आलं आहे. परंतु कुटुंबांमध्ये मतभेद कायम राहतील.
अलीकडे, ऐश्वर्या राय बच्चनने संपूर्ण बच्चन कुटुंबाबरोबर ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या कार्यक्रम सोहळयाला हजेरी लावली होती. यावेळी ऍश पदार्पणासाठी सज्ज असलेल्या भाच्याला म्हणजेच अगस्त्य नंदाला पाठिंबा दर्शविताना दिसली. बच्चन कुटुंबाबरोबर पोज देताना ऐश्वर्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच, नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाल्या होत्या.