Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व विशेष गाजताना दिसतंय. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात रील स्टार, गायक, अभिनेते, अभिनेत्री अशा विविध कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींना संधी मिळालेली पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात राहत आहे. ‘बिग बॉस’च घर म्हटलं की वाद हे आलेच. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमधील वाद, अरेरावीपणा, दादागिरी, तुफान राडे हे सारं काही पाहायला मिळालं. दरम्यान यंदाच्या या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख साकारत आहे. रितेश देशमुखच्या भाऊचा धक्काने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली कारण रितेश भाऊच्या धक्क्यावर येऊन स्पर्धकांची चांगली शाळा घेताना दिसला.
सुरुवातीचे काही काही आठवडे भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना चांगलं झापलं नाही म्हणून रितेशला ट्रोल करण्यात आलं. मात्र नुकत्याच झालेल्या चौथ्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने स्पर्धकांची चांगली शाळा घेतली. इतकंच नव्हे तर स्पर्धकां समोर इतर स्पर्धकांची पोलखोलही केलेली पाहायला मिळाली. अशातच भाऊच्या धक्क्यावर एक नवा प्रोमो समोर आला आहे तो म्हणजे चक्रव्यूह. भाऊच्या धक्क्यावर या चक्रव्यूहच्या प्रोमोमध्ये सर्वप्रथम निक्की तांबोळी चक्रव्यूहमध्ये जाताना दिसते आणि त्यावेळेला तिच्या समोर तिच्या टीम मधील स्पर्धकांचा खरा चेहरा येतो.
टीम ए मधील स्पर्धक निक्कीच्या पाठी निक्कीबाबत काय काय बोलतायेत याचा खुलासा या चक्रव्यूहमध्ये करण्यात आला आणि त्यामुळे निक्कीला खूप मोठा धक्का बसला. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की, निक्की चक्रव्यूमधून बाहेर आल्यावर सगळ्यांकडे पाहत जोरजोरात टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते की, “अगदी योग्य अशा ग्रुप ए साठी टाळ्या सर. यांच्या बोलण्यामध्ये दम तर नाही आहे आणि हे हलके लोक आहेत. माझा वादा आहे की मी ग्रुप एला ट्रॉफी उचलू देणार नाही”.
आणखी वाचा – “मुलीची आई कोण आहे?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर करण जोहरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “खूप त्रास झाला आणि…”
एकूणच निक्कीसमोर ग्रुप ए मधील स्पर्धकांचा खरा चेहरा येतो. हे पाहून निक्की खूप भडकते. आता निक्की तिच्या टीम मधील स्पर्धकांबरोबर वा स्पर्धकांसाठी खेळणार का हे पाहणं येणाऱ्या आगामी भागात रंजक ठरेल.