‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांचा १०० दिवसांचा खेळ सुरु असलेला पाहायला मिळत आहे. १०० दिवस या घरात टिकून रहाण्यासाठी स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर १०० दिवसांचा हा प्रवास करताना प्रत्येक स्पर्धक त्याच्या कुटुंबाला मिस करताना दिसत आहे. हा प्रवास नेहमीच त्यांना त्यांच्या मुलांची, घराची, आई-वडिलांची आठवण येत असते. ‘बिग बॉस’ने आणि रितेशने या घरातील सदस्यांच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ प्रत्येक सदस्याला दाखवला, ज्याने साऱ्यांना अश्रूही अनावर झाले. हे सरप्राइज साऱ्यांना रडवणारं होतं. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरातील अभिजीत सावंत या स्पर्धकाला त्याच्या दोन्ही लेकींचा व्हिडीओ दाखवला. (Abhijeet Sawant Emotional)
अभिजीत सावंतला आहना व स्मिरा अशा दोन मुली आहेत. खास बाबांसाठी आणि बाबाच्या खेळाचं कौतुक करायला आहना व स्मिरा यांनी व्हिडीओ करुन पाठवला. कालच्या भागात हा व्हिडीओ दाखवण्यात आला तेव्हा दोन्ही लेकींना दीड महिन्याने समोर पाहून अभिजीतचा बांध फुटला. दोघींनी अगदी संस्कार जपत सुरुवातीला सगळ्यांना नमस्कार केला. आणि अभिजीतला म्हणाल्या, “हाय डॅडा, कसा आहेस तू? नमस्कार रितेश भाऊ आणि बाकीच्या सगळ्या सदस्यांना. डॅडा, तुला एका महिन्यांनी आम्हाला बघून कसं वाटतंय? तुझी खूप आठवण येतेय पण तू काळजी नको करु. तू गेमवर फोकस कर, तू जेवढं चांगलं खेळतो ना, तसंच खेळत राहा”.
आणखी वाचा – प्रथमेश लघाटेने बनवले मोदक, बायकोचा स्वयंपाकही त्याच्यासमोर फेल, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव
पुढे अभिजीतची मोठी लेक आहना म्हणाली, “मला माहितीये तुला तुझे क्रॉक्स खूप प्रिय आहेत. पण त्यांना थोड्यावेळ साइटला ठेव आणि स्पोर्ट्स शूज घाल. टास्कसाठी तरी. तू खरंच खूप चांगलं खेळतोस”. त्यानंतर दोघी एकत्र म्हणाल्या की, “जेव्हा तू इंडियन आयडल बनला होता आणि ट्रॉफी घेतली होती. तेव्हा आम्ही नव्हतो. पण यावेळेस आम्हाला तुला ट्रॉफी घेताना बघायचं आहे. ऑल दे बेस्ट”.
दोन्ही मुलींचा हा व्हिडीओ पाहून अभिजीतला अश्रू अनावर झाले. तो ढसाढसा रडू लागला. तेव्हा रितेशने त्याला धीर दिला आणि विचारलं, “अभिजीत, सरप्राइज कसं वाटलं?”. यावर अभिजीत म्हणाला, “दोन दिवसांनंतर पण मुलांना बघणं खूप भारी असतं. आज दीड महिना होईल. त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की, तुमचा बाबा लढतोय. बाबावर विश्वास ठेवा. लढत राहिन. जोपर्यंत इथे आहे. थँक्यू”.