Actor Vijay GOAT Movie : विजय दक्षिणेतील मोठा स्टार असून हिंदीमध्येही तो बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. त्याचे बहुतेक चित्रपट टिपिकल मसाला चित्रपट असतात जे अडीच तीन तास प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात चांगलेच यशस्वीही होतात. विजयचा नवीन G.O.A.T (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) ही असाच निखळ मनोरंजन करणारा तीन तासांचा मसालेदार चित्रपट आहे. साऊथमध्ये हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत असून देशभरात काही ठिकाणी हिंदीतही प्रदर्शित करण्यात आलेला आहे. या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ४५० कोटींची कमाई केली. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहे. (Actor Vijay GOAT Movie OTT Release)
विजयच्या GOAT या चित्रपटाने देशात २५ दिवसांत २४९.७५ कोटींची कमाई केली आहे. जगभरातील एकूण कमाई ४४९. ३५ कोटी रुपये आहे. बक्कळ कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट घरबसल्याही पाहता येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये ज्यांना हा चित्रपट पाहता आला नव्हता ते आता घरी बसून याचा आनंद घेऊ शकणार आहेत. हा चित्रपट ३ ऑक्टोबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तामिळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.
एम. एस. गांधी (विजय) एक स्पेशेल दहशतवादविरोधी पथकाचा सदस्य आहे. स्वतःच्या कुटुंबीयांपासून लपवून तो देश वाचवण्याचे काम करीत असतो. अशाच एका केनियातील मोहिमेत देशद्रोही वैज्ञानिक मेननचे कुटुंब मारले जाते. त्यानंतर थायलंडमधील एका मोहिमेत गांधीच्या कुटुंबावर हल्ला होता. यात त्याचा लहान मुलगा मारला जातो. परंतु काही वर्षानंतर रशियामध्ये विजयची त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या तरुणाशी भेट होते. तो त्याचा मुलगा जीवन (विजय) असतो. तो विजयला घेऊन घरी येतो, त्यानंतर मात्र गांधीच्या टीममधील एकेका सहकाऱ्याची हत्या होण्यास सुरुवात होते आणि एकामागोमाग एका रहस्यांचा उलगडा कसा होत जातो अशी या चित्रपटाची कथा आहे.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! खुशबू तावडे व संग्राम साळवी यांना कन्यारत्न, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण
दरम्यान, GOAT हा विजयचा दूसरा अंतिम चित्रपट आहे. तो राजकारणात सक्रीय होणार असल्यामुळे या क्षेत्राला रामराम करत आहे. GOAT नंतर विजय ‘थलपथी ६९’मध्ये दिसणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होणारा हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल. यानंतर ते राजकारणात उतरून जनतेची सेवा करणार आहे.