शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अपघात झाला, गाडी बंद पडली आणि…”, मराठी अभिनेत्याचा गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तासभर मदत मिळालीच नाही”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2025 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suyash tilak car accident

"अपघात झाला, गाडी बंद पडली आणि…", मराठी अभिनेत्याचा गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "तासभर मदत मिळालीच नाही"

suyash tilak car accident : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकबाबत मोठी बातमी समोर आली आहे. का रे दुरावा या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या सुयशच्या अपघाताची बातमी समोर आली. ही धक्कादायक बातमी समोर येताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. पण या अपघातात सुयश सुखरूप असल्याचं समजलं आणि चाहत्यांच्या जीवात जीव आला. सुयशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं. सुयश सोशल मीडियावर सक्रीय असतो. सुयशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या कारचा अपघात झालेला दिसत असून सुयशने अपघाताबद्दल सांगितलं आहे.

सुयशच्या अपघातानंतर सहा ते सात तास टोईंग ट्रकमध्ये बसून मुंबईला आला असल्याचं दिसत आहे. याबद्दल सांगताना सुयशने लिहिलं की, “वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास, थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, झालेल्या नुकसानामुळे माझी गाडी अक्षरशः बंद पडली. मला किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती. घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करुन थेट मुंबईत आणणं. साधारण तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मदत पोहोचली”.

आणखी वाचा – “सध्याच्या काळात मूल जन्माला घालूच नये”, बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, म्हणाली, “आईबाप व्हायचं म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

पुढे सुयश म्हणाला, “टो ड्रायव्हर म्हणाला, तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर? मदत काय? गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती, मग मी बसलो होतो एका शांत एसी नसलेल्या माझ्या गाडीत. सहा-सात तास महामार्गावरुन ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत, काही जण माझ्या अवस्थेवर हसत होते, तर काही कदाचित काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते. मी रागावू शकलो असतो, चिडलो असतो, वैतागलो असतो. पण कधी-कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणते, ती तशीच स्वीकारावी लागते”.

आणखी वाचा – १४ वर्षांच्या मैत्रीमागची खरी कहाणी, हर्षदा खानविलकरचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझ्यानंतर माझ्या आईचं करायला मृणाल आहे”

शेवटी सुयश म्हणाला, “मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो. या असामान्य हलत्या सीटवरुन जग सरकताना पाहिलं. दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपला आणि तो एडिट करुन मिनी व्लॉग बनवला. तुम्ही या व्लॉगचा आनंद घ्या. कधी कधी, आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता किंवा खिडकी उघडून, खोल श्वास घेऊन, तो प्रवास एन्जॉय करु शकता”.

Tags: car accidentmarathi actorsuyash tilak
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
tharala tar mag news

"मी सदैव तुझं रक्षण करेन", 'ठरलं तर मग'च्या सेटवर जुईला खास व्यक्तीने बांधली राखी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.