काही कलाकार हे पडद्यावर जेवढे मोठे होतात तेवढाच त्यांच्या स्ट्रगल हि कठोर असतो. अगदी आज यशाच्या शिखरांवर असणारा कलाकार एके काळी दिसण्यावरून, राहणीमानावरून डावलला जायचा परंतु स्वतःच आत्मपरीक्षण करून न थांबता, खचता आज तो कलाकार स्वतःच्या पायावर उभा आहे. अंगी कला असणं हे रंग रूपापेक्षा कधी हि एक पाऊल तुम्हाला पुढे ठेवत हे त्या कलाकाराचा संघर्ष आणि यश वारंवार सांगत असत. असाच एक कलाकार मराठी चित्रपट सृष्टीला लाभला आहे. ज्याला कधी काळी त्याच्या दिसण्या वरून चिडवलं जायचं पण त्याने हार न मानता आज मराठी माणसाच्या मनात कायमच घर केलं आहे. तो अभिनेता म्हणजे #आपला सिद्धू म्हणून सर्वत्र ओळख असलेला सिद्धार्थ जाधव.(Siddharth Jadhav struggle story)
अभिनयाच्या एका वेगळ्या अंदाजात, विनोदाच्या एका वेगळ्या धाटणीत अभिनय करणारा अभिनेता म्हणजे सिद्धू अशी सिद्धार्थची ओळख सांगितली जाते. इयत्ता पहिली पासून कोकणातून मुंबईत येऊन शिकलेला सिद्धू आज मनोरंजन सृष्टीमधला चमचमता तारा म्हणून ओळखला जातो. त्याच्या आता पर्यंतच्या यशा मागे बराच संघर्ष आहे असं तो सांगतो.
असा होता सिद्धूच्या संघर्षाचा काळ(Siddharth Jadhav struggle story)
एका मुलाखतीत सिद्धू ने हा प्रसंग सांगितलेला कि अभिनय साकारतानाच्या सुरुवातीच्या काळांत त्याच्या दिसण्यावरून हिणवलं जायचं, असा कोण ऍक्टर असतो का? या शब्दात त्याला चिडवलं जायचं. एकाने तर सिद्धूला चक्क तू मरत का नाहीस ही कंमेंट केली होती. फक्त प्रेक्षक नाही तर दिगदर्शकानी सुद्धा त्याला शिवीगाळ केली होती, काम मागण्यासाठी गेल्यावर झालेल्या थट्टेमुळे सुद्धा सिद्धार्थला मानसिक त्रास झाला होता.
सर्व गोष्टींमुळे कधी कधी मी खूप रडायचो असं हि सिद्धू ने सांगितलं पण जेव्हा दादा ने मला समजावलं तेव्हा पासून माझ्यात बद्दल होऊ लागला मी स्वःताला खुश ठेवण्यासाठी , स्वतःला आवडण्यासाठी प्रयत्न करू लागलो आणि जे केलं ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलं असं सिद्धार्थने सांगितलं आणि आज सिद्धार्थ जाधव हे नाव बॉलीवूड असो किंवा मराठी सिने सृष्टी सगळीकडे अभिमानानं घेतलं जात.
====
हे देखील वाचा- रक्तामंदी उसळं तापता लाव्हा…’ अंगावर शाहारे आणणारं सुभेदारच मोशन पोस्टर प्रदर्शित
====
अगं बाई अरेच्चा, जत्रा, गोलमाल, यांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सिद्धार्थ कुठेही कमी पडलेला दिसत नाही. केवळ चित्रपटांमधूनच नाही तर मालिका, विनोदी शो, डान्स शो, मालिका अशा अनेक माध्यमांमधून सिद्धू ने अभिनय सादर केला आहे. आणि अजूनही त्याच्या यशाची घोड दौड अशीच चालू आहे. त्याने पाहिलेला, अनुभवलेला संघर्ष काळ त्याला नेहमी अवघड काळात प्रेरित करेल एवढं नक्की.
“तू लढता जा मुसाफिर
ये जिंदगी मोहताज
है तेरे कर्म की हुस्न की नहीं”
या ओळी सिद्धार्थच्या संघर्षाचा भावार्थ सांगतात.