चित्रपटांच्या इतिहासात काही चित्रपट त्याच्या कथा, वाक्य, पात्र, गाणी सगळं काही अजरामर होऊन जातात. रुपेरी पडद्यावरचा असाच एक अजरामर चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. विनोदी चित्रपटांच्या यादीत महत्वाचं स्थान असलेला चित्रपट हा कायम चिरतरुण राहणारा चित्रपट ठरला आहे.(Ashi hi Banva Banvi)
चित्रपटाची कथा आणि त्याला अनुसरून झालेलं कास्टिंग हे इतकं परफेक्ट जमलं कि प्रत्येक पात्रांने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेते अशोक सराफ, अभिनेते सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या मंडळीने पडद्यावर दाखवलेली आपली जादू आज ही कमी झालेली नाही.
अशी झालं होत गाण्याचं शूटिंग?(Ashi hi Banva Banvi)
चित्रपटातील कथे प्रमाणे चित्रपटाची गाणी सुद्धा चांगलीच गाजली या चित्रपटातील ‘ हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची क्रेझ सगळीकडे पसरली. या गाण्याचा एक भन्नाट किस्सा निवेदिता सराफ, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांनी शेअर केला आहे. ज्या ४ जोडप्यांचा डान्स या गाण्यात दाखवण्यात आला आहे तो डान्स एकाच ठिकाणी शूट न करता वेगवेगळ्या जागांवर शूट करण्यात आला होता. तर जोड्यांमध्ये निवेदिता आणि सुशांत यांच्या जोडीचा धमाल किस्सा निवेदिता सराफ यांनी सांगितला आहे. अभिनेता सिद्धार्थ हा उंचीने निवेदिता यांच्या पेक्षा मोठा असल्याने संपूर्ण डान्स निवेदिता यांना वर बघत तर सिद्धार्थ ला खाली बघत करावा लागला होता. तर कथेमध्ये बाकीच्या ३ जोडप्यांमध्ये प्रेम संबंध दाखवण्यात आल्यामुळे डान्स बसवताना काही अडचण आली नाही पण भांडण झालेल्या या जोडप्याचा डान्स बसवताना मोठी कसरत करावी लागली असं कोरियोग्राफर सचिन पिळगावकर यांनी सांगितलं.
तर लक्षमिकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या गाण्याच्या पोर्शनची तालीम मुंबईत करून गाणं पुण्यात शूट करावं लागलं होत ते ही कमालीचं असल्याची आठवण अशोक सराफ आणि सचिन यांनी सांगितली होती.
अशी ही बनबनवी चित्रपटाने मिळालेली लोकप्रियता पाहून तेलुगू भाषेत चित्रम भल्लारे विचित्रम,कन्नड भाषेत ओलू सार बारी ओलू, हिंदी भाषेत पेईंग गेस्ट, पंजाबी भाषेत Mr & Mrs ४२० आणि बंगाली भाषेत जिओ पगला या भाषांमध्ये चित्रपटाची पुन्हा एकदा निर्मिती करण्यात आली. तर या सदाबहार चित्रपटाला आजही प्रेक्षकांचं भाभृ प्रेम मिळत. चित्रपटातील डायलॉग्स वर आजही अनेक मिम्स व्हायरल होताना दिसतात.(Ashi hi Banva Banvi)
====
हे देखील वाचा – ‘तू मरत का नाहीस, दिगदर्शकाकडून शिवीगाळ, दिसण्यावरून चिडवलं तरीही आज मानानं घेतलं जात नाव..
====