अनेकदा मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनयावरून किंवा कोणत्या कृत्यावरून कलाकार मंडळींना प्रेक्षक ट्रॉल करत असतात. मात्र कलाकार नेहमी या गोष्टींकडे साकारातमक दृष्टीने बघत किंवा कधी कधी कानाडोळा करत आपलं काम चालू ठेवतात.(Siddharth Jadhav)
मात्र कधी कधी या होणाऱ्या ट्रोलिंगची हद्द एवढी वाढते कि कलाकाराला उत्तर देणं भाग पडत. असच काहीस झालंय अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत.

सिद्धार्थच्या पोस्ट वर आक्षेपार्ह्य कमेंट करणाऱ्या एका ट्रोलरचा सिद्धार्थने चांगलाच समाचार घेतल्याचं दिसतंय. त्या संदर्भात त्याने स्टोरी पोस्ट करत माहिती दिली आहे. सिद्धार्थच्या एका पोस्ट वर एकाने आई वरून शिवी देत कमेंट केली. त्या कमेंटचा स्क्रीनशॉट स्टोरी वर पोस्ट करत सिद्धार्थ ने लिहिलं आहे ” ट्रोलिंग मान्य आहे” पण शिव्या देणं कितपत योग्य आहे?”. अशा शब्दात आपलं मत मांडत सिद्धार्थ ने ट्रोलरच्या कमेंटला सध्या भाषेत उत्तर दिले.(Siddharth Jadhav)
अनेक मराठी चित्रपटांमधून तसेच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा सिद्धार्थ ने अभिनय केला आहे. आणि त्यामुळेच आज लाखो प्रेक्षकांच्या मनात त्याने आपली स्वातंत्र्य जागा निर्माण केली आहे.एखाद्यावर टीका करणं फार सोप्प असत पण दरवेळी समोरचा ऐकून घेईलच असं सहसा होतं नाही.