कलाकार म्हटलं की त्यांच्या खासगी वा वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबाबाबतचे अनेक अपडेट चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. विशेषता कलाकाराचं आणि त्याच्या मुलांचं बॉण्डिंग हे सोशल मीडियावर बरेचदा चर्चेत असतं. असाच एका कलाकाराचं त्याच्या लेकीबरोबर खास बॉण्डिंग आहे. हा एक कलाकार म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे. श्रेयस आणि त्याच्या लेकीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होतात. श्रेयस अनेकदा त्याच्या लेकीचे कौतुक करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. (Shreyas Talpade And Daughter)
अभिनेता श्रेयस तळपदेने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयाची छाप पाडल्यानंतर श्रेयसने बॉलीवूडमध्ये ही प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक दर्जेदार हिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत श्रेयस नेहमीच प्रेक्षकांच्या आवडता अभिनेता ठरला. चित्रपटांमधून काहीसा ब्रेक घेत श्रेयसने मराठी मालिकेतही महत्त्वपूर्ण काम केलं.

अशातच श्रेयसच्या पत्नीने शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. दीप्तीने शेअर केलेल्या फोटो वरून श्रेयस आणि त्याची लेक आद्या यांच्यातील बॉण्डिंग पाहायला मिळतंय. आद्याने श्रेयसच्या केसांना तिचे क्लिप्स लावलेले पाहायला मिळतया आहेत. हे हेअर क्लिप्स पाहून श्रेयस आद्याबरोबर वेळ घालवताना दिसतोय. कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून श्रेयस नेहमीच त्याच्या कुटुंबीयांना वेळ देत असतो. बरेचदा तो कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो- व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
“आजी, मालिकाविश्व अन् प्रामाणिक मत”, प्रसाद जवादेने शेअर केला ‘पारू’ मालिकेच्या चाहतीचा खास किस्सा
काही दिवसांपूर्वी श्रेयसबाबत समोर आलेल्या धक्कादायक बातमीने साऱ्यांनाच धक्का दिला. श्रेयसला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचं समजल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड काळजीच वातावरण पाहायला मिळालं. मात्र उपचार घेऊन श्रेयस आता पूर्णपणे बरा झाला असून त्याने चित्रीकरणालाही सुरुवात केली असल्याचे समोर आले. श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती २०१८ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील झाले. जेव्हा ते पालक झाले तेव्हा ते हाँगकाँगमध्ये सुट्टी घालवत होते. सरोगेट आईला प्रसूतीच्या वेदना झाल्याची बातमी मिळताच ते तिथून परतले आणि फ्लाइटमध्येच त्यांना आई-वडील झाल्याची माहिती मिळाली.