शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संकर्षण कऱ्हाडेने अमेरिकेतल्या चाहत्यांची मागणी केली पूर्ण, सादर केली खास कविता, म्हणाला, “भ्रष्टाचार पुन्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 18, 2023 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Viral Video

अमेरिकेतल्या चाहत्यांची संकर्षण कऱ्हाडेने केली मागणी पूर्ण, सादर केली खास कविता, म्हणाला, "भ्रष्टाचार पुन्हा…"

सध्या बऱ्याच नाटकांचे परदेश दौरे सुरु आहेत. अशातच ‘नियम व अटी लागू’ या नाटकाची टीमही परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. परदेशातील नाटकादरम्यानचे अनेक फोटो व्हिडीओ कलाकार मंडळी सोशल मीडियावरून शेअर करत आहेत. या नाटकात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. संकर्षण एक अभिनेता म्हणून उत्तम आहेच शिवाय तो एक उत्तम निवेदक, गायकही आहे. सोशल मीडियावरून नेहमीच तो काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सध्या संकर्षणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (Sankarshan Karhade Viral Video)

संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांची मागणी पूर्ण केली आहे. अमेरिकेत दौऱ्यानिमित्त गेलेला संकर्षणला त्याच्या अमेरिकेतल्या चाहत्यांनी धरलं आणि त्याला कविता म्हणून दाखवायला सांगितली. यावेळी त्याने देशावर आधारित कविता चाहत्यांना म्हणून दाखवली. देशाप्रतीचे संकर्षणच हे प्रेम पाहून चाहत्यांच्या मनात त्याच्याबाबतचा आदर अधिक वाढला आहे.

आणखी वाचा – अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक गाजवणार रंगमंच, ‘या’ नाटकानिमत्त पहिल्यांदाच एकत्र

View this post on Instagram

A post shared by THE unique LIFESTYLE❣️ (@the_unique_lifestyle_9294)

संकर्षणने मराठी प्रेक्षकांच्या विनंतीचा आदर करून देशभक्तीपर कविता म्हणून दाखवली. संकर्षण म्हणाला, “भिन्न भाषा, भिन्न राज्यं वेगवेगळा वेश आहे, संस्कृतीने नटलेला भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर, सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर, साहित्य, कला, विज्ञानातही सुवर्ण अक्षर गिरवायचंय अन् येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय. विनंती करतो भावांनो अनावश्यक खिसा भरू नका, चार घास कमी खा…पण, भ्रष्टाचार पुन्हा करू नका. सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू, रमजान-दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू. काय कोणाची बिशाद आता आणि काय कोणात आहे दम मनात ठेवा देशाला अन् म्हणावं ते वंदे मातरम.”

आणखी वाचा – नात्याबाबत कळताच घरी कोंडून ठेवलं, विशीत लग्न अन्…; विशाखा सुभेदारने प्रियकराशीच केला विवाह, म्हणाली, “बालिश असतो पण…”

संकर्षणने कविता सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी संकर्षणचं भरभरून कौतुक केलं. आणि त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे

Tags: entertainmentniyam va ati lagusankarshan karhade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Narkar Couple Dance On Trending Song

"आमच्या पप्पांनी गणपती आणला…" या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, "आमच्या..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.