अनेक कलाकारांचे शूटिंग दरम्यान छोटे मोठे अपघात होत असतात. तरीही कलाकार त्यांच्या कामात कुठलीही कसूर ठेवत नाही ही एका उत्तम कलाकाराची लक्षण आहेत असं मानलं जात. असाच एक नेहमी हसतमुख असणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण सोबत ही असच काहीसं घडलंय. संगकर्षण ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटो मध्ये त्याच्या हाताला काहीतरी जखम झाल्याचं दिसतंय पण या फोटोला संकर्षण ने दिलेलं कॅप्शन मात्र प्रेक्षकांना हसायला भाग पाडतय.(Sankarshan Karhade Attacked)
संकर्षण ने त्या पोस्टला ‘परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला..मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले ..त्यात माझा १ (एक) हात जखमी झालाय.. ह्याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय.. ????????’असं मजेदार कॅप्शन दिल आहे.
संकर्षणच्या या पोस्ट वर प्रेक्षकांनी त्याला काळजी घे, लवकर बारा हो अशा कमेंट्स करत सल्ले दिले आहेत. तर काहींनी मजेशीर कमेंट्स करत संकर्षणच्या या पोस्टचा आनंद देखील घेतला आहे. माझी तुझी रेशीमगाठ समीर या भूमिकेसाठी संकर्षणला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्या नंतर रंगभूमीवर त्याच नियम व अटी लागू हे नाटक ही सध्या चांगलाच गाजतंय.(Sankarshan Karhade Attacked)