शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि…; ‘असंभव’ रहस्यपटातून उलगडणार थरार, मुक्ता बर्वेची दुहेरी भूमिका?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2025 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Asambhav movie

घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि…; असंभव रहस्यपटातून उलगडणार थरार, मुक्ता बर्वेची दुहेरी भूमिका?

Asambhav movie : सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ या चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी झळकलेल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. रहस्याची चाहूल देणारं ते पोस्टर पाहून सगळेच नेमकं काय?, या विचारात पडले होते. आणि आता त्याच कुतूहलाला आणखी उंची देत, चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या नजरेतच जाणवतं, हा फक्त एक चित्रपट नसून मन हेलावून टाकणारा एक अनुभव आहे. या टीझरमध्ये मुक्ता बर्वेसोबत काहीतरी अघटित घडताना दिसतंय. तिची घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि अचानक घडणाऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे. मुक्ता बर्वे दुहेरी भूमिकेत आहे का? हा प्रश्नही सतत मनात घोळतोय.

दुसरीकडे प्रिया बापटही एका गूढ भूमिकेत झळकतेय, तिचं पात्र काहीतरी लपवतंय असं जाणवतं. हवेलीत काही गुपितं दडलेली आहेत, कुणाचा तरी खून होताना दिसतो, पण कोणाचा आणि का? सचित पाटील स्वतः या गूढाच्या शोधात आहे, तर संदीप कुलकर्णीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले असून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘असंभव’ पाहिल्यावर मिळणार आहेत. या टीझरमधून स्पष्ट होतंय की ‘असंभव’ रहस्यपट असून भावना, थरार आणि अप्रत्यक्षित घटनांनी भरलेला एक मनोवैज्ञानिक प्रवास आहे.

आणखी वाचा – “आता माझी हेल्थ साथ देत नाही तरीही…”, ‘ठरलं तर मग’मधील एंट्रीनंतर रोहिणी हट्टंगडी यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “या वयामध्ये…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

या सिनेमात काहीतरी वेगळं, नवं आणि विचार करायला लावणारं आहे, हे काही सेकंदांतच जाणवतं. प्रेक्षकांना कधीही न पाहिलेला सिनेमॅटिक अनुभव देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, नैनितालमधील निसर्गरम्य ठिकाणांवर झालेलं चित्रीकरण, आणि तांत्रिक बाजूंची भव्यता हे सगळंच अप्रतिम दिसतेय. दिग्दर्शक, निर्माते सचित पाटील म्हणाले, ” ‘असंभव’ हा माझ्यासाठी केवळ रहस्यपट नाही, तर मानवी मनाच्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पात्रात एक गूढ आहे आणि ते उलगडत जाताना प्रेक्षकांचं मन हादरणार आहे. टीमने पूर्ण समर्पणाने काम केलं असून हा चित्रपट केवळ पाहाण्याचा नसून अनुभवण्याचा आहे.”

आणखी वाचा – अखेर ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजी परतल्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार ही भूमिका, पहिला फोटो समोर

या चित्रपटाचं सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं असून, प्रमुख भूमिकेत सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी आहेत. ‘असंभव’ची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी केली आहे. तर सह-निर्मिती एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर तसेच संजय पोतदार यांनी केली आहे.

Tags: Asambhav Moviemarathi moviesachit patil
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Paus 2 Webseries trailer

दोन जीव प्रेमाने जोडत, पुन्हा नव्याने भेटीस येतोय 'पाऊस २', नवोदित जोडीच्या अभिनयाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.