शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन जीव प्रेमाने जोडत, पुन्हा नव्याने भेटीस येतोय ‘पाऊस २’, नवोदित जोडीच्या अभिनयाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2025 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paus 2 Webseries trailer

दोन जीव प्रेमाने जोडत, पुन्हा नव्याने भेटीस येतोय 'पाऊस २', नवोदित जोडीच्या अभिनयाने वेधलं लक्ष

Paus 2 Webseries trailer : ‘इट्स मज्जा’ हे चॅनेल नेहमीच नवनवीन कंटेंट घेऊन येत रसिकांच्या मनात घर करतं. मनोरंजनाच्या बाबतीत तर ‘इट्स मज्जा’ हे चॅनेल कुठेच कमी पडलेलं नाही. या चॅनेलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या चॅनेलमार्फत आलेल्या ओरिजिनल सिरीज नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. यांत ‘आठवी-अ’, ‘दहावी-अ’, ‘पाऊस’ ‘मैत्रीचा सातबारा’, या वेबसिरीजची नाव घेणं वावगं ठरणार नाही. प्रत्येक एपिसोडला मिलियन व्ह्यूज मिळवत या सिरीज जगभरात लोकप्रिय आहेत. आणि प्रत्येक सिरीजचा असा स्वतःचा चाहतावर्ग आहे. आता या चाहत्यावर्गासाठी ‘इट्स मज्जा’ ‘पाऊस २’ ही नवी सिरीज घेऊन येत आहे.

नुकताच पाऊस २ चा ट्रेलर रसिकांच्या भेटीस आला. पोस्टर आल्यानंतर यांत ‘पाऊस’ सिरीजमधील कलाकार असतील असा प्रेक्षकांचा अंदाज होता. मात्र, तसं न होता ‘पाऊस २’ मुळे एक नवोदित जोडी या सिरीजमुळे सिनेविश्वाला मिळाली आहे. पाऊस २ मध्ये अभिनेत्री कादंबरी माळी आणि अभिनेता तेजस कवार ही नवी जोडी दिसणार आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये दोघांच्या अभिनयाची धमाकेदार झलक पाहायला मिळाली. अर्थात सुंदर अशा निरसर्गरम्य वातावरणात सुरु झालेला हा रोमँटिक प्रवास ट्रेलरच्या सुरुवातीलाच मन जिंकतोय.

आणखी वाचा – अखेर ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजी परतल्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार ही भूमिका, पहिला फोटो समोर

मात्र, ट्रेलरच्या मध्यात “प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो तसं प्रत्येकाचं भिजणंही वेगळं असतं” या अभिनेत्रीच्या वाक्याने पूर्ण कथेत ट्विस्ट आला. या वाक्यानंतर ट्रेलरमध्ये दोन प्रेमीयुगुलामधील फूट पाहायला मिळतेय. नायक आणि नायिकेच्या नात्याला कुटुंबाकडून, गाववाल्यांकडून मिळालेला नकार पाहता सिरीजमध्ये नेमकं काय घडणार ही उत्सुकता वाढवतंय.

आणखी वाचा – “आता माझी हेल्थ साथ देत नाही तरीही…”, ‘ठरलं तर मग’मधील एंट्रीनंतर रोहिणी हट्टंगडी यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “या वयामध्ये…”

‘मीडिया वन सोल्युशन’ प्रस्तुत आणि ‘इट्स मज्जा ओरिजिनल सिरीज’ ‘पाऊस २’ या सिरीजच्या निर्मितीची धुरा निर्माते शौरिंद्र नाथ दत्ता यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शनाची बाजू दिग्दर्शक नितीन पवार यांनी सांभाळली आहे. तर प्रोजेक्ट व क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे या आहेत. या सिरीजची पटकथा नितिन पवार-नितिन वाडेवाले यांची असून संवाद नितीन पवार यांनी लिहिले आहेत. सिरीजचे पार्श्वसंगीत व संगीत संयोजक मंदार पाटील असून चित्रपटातील गाणी गायक ओंकारस्वरुप आणि गायिका आचल ठाकूर हिने त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केली आहेत.

Tags: its majjamarathi webseriesPaus 2
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
genelia deshmukh niece

जिनिलिया देशमुखचं पुतणीबरोबर आहे खास बॉण्डिंग, धनत्रयोदशीला औक्षण करताच अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.