शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Rituraj Singh Passes Away : मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा काळाच्या पडद्याआड, अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन, रुग्णालयात उपचार सुरु होते पण…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 20, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
TV Actor Rituraj Singh Death News in Marathi

मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा काळाच्या पडद्याआड, अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन, रुग्णालयात उपचार सुरु होते पण...

Rituraj Singh Death : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दुख:द बातमी समोर येत आहे. टीव्ही मालिकांचा व चित्रपटांचा प्रसिद्ध चेहरा असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले आहे. काल (१९ जानेवारी) रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या काही आजाराने ग्रासले होते. अशातच काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

वृत्तानुसार, ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात सुधारणा होऊन ते घरी परतल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अमित बहल या ऋतुराज सिंह यांच्या जवळच्या मित्राने त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. यावेळी अमित बहल यांनी असं म्हटलं की, “होय. ऋतुराज यांचे “हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांना स्वादुपिंडाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र घरी परतल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले”.

View this post on Instagram

A post shared by RITURAJ K SINGH (@riturajksingh)

आणखी वाचा – “अफेअर केलं तरी…”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर…”  

दरम्यान, ऋतुराज यांनी अपनी बात , हिटलर दीदी, ज्योती, शपथ, वॉरियर हाय, आहट, अदालत, दिया और बाती हम, अनुमपा अशा मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. त्याचबरोबर काही हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्येही अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

आणखी वाचा – लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी…”

ऋतुराज सिंग यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन सृष्टीत सध्या शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनावर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार व चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags: Actor Rituraj Singh Passes Away at 59Anupamaa actor Rituraj Singh dies Marathi NewsRituraj SinghRituraj Singh Breaking News TodayRituraj Singh Passes Away due to heart attackTV actor Rituraj Singh Death Marathi NewsTV Actor Rituraj Singh Death News in MarathiTV actor Rituraj Singh Familyअनुपमा अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधनअभिनेता ऋतुराज सिंह ब्रेकिंग न्यूज टुडेअभिनेता ऋतुराज सिंह यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधनऋतुराज सिंहऋतुराज सिंह निधनऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

लग्नानंतर देवदर्शन करत आहेत मुग्धा-प्रथमेश, उत्तरप्रदेशमध्ये भटकंती, गंगेचं दर्शन घेतलं अन्…; फोटोंनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.