महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. राजकारणातले राजहंस अशी ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांची भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची सामान्यांना भुरळ पडत असे. विलासराव देशमुख हे विरोधी पक्षातही लोकप्रिय होते. सरपंच म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या विलासरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय मंत्री असा प्रवास केला. १९७४ पासून राजकारणात पाऊल ठेवलेल्या विलासरावांनी नंतर कधीच मागे वळून कधी पाहिले नाही. (Vilasrao Deshmukh First Chief Minister Swearing)
ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदापासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासरावांनी मुख्यमंत्री पदापर्यंत आपला राजकीय प्रवास केला. १९९५ च्या निवडणुकीत त्यांचा ३५,००० च्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर सप्टेंबर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून राज्य विधानसभेवर पुन्हा निवडून आले आणि सलग दोन निवडणुकांमध्ये सुमारे ९१,००० च्या फरकाने विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले, जे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मग १८ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज या घटनेला २५ वर्षे झाली आहेत. याचनिमित्ताने विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘पाऊस’ वेबसीरिजमधील ट्वीस्ट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजूनही सायलीला विशालची आठवण, पुढे काय घडणार?
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या पत्नीसह अनेक व्हिडीओ शेअर असतो. अशातच त्याने वडिलांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या शपथविधीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने शपथ घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “२५ वर्षांपूर्वी १८ ऑक्टोबर १९९९ रोजी माझ्या वडिलांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली”. रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाण व गौतमी पाटीलची भेट, व्हॅनिटी व्हॅनमध्ये रंगल्या गप्पा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं अमित व धीरज देशमुख यांनी काँग्रेसची भक्कम साथ दिली आहे. पण रितेशने सक्रीय राजकरणात सहभाग न घेता मनोरंजन सृष्टीत आपली वेगळी वाट निवडली आहे. त्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. अभिनेता व दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका त्याने पर पडल्या आहेत. रितेश राजकारणात नसला तरी अनेकदा तो राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करत असतो.