Malaika Arora : काही दिवसांपूर्वी मलायका अरोराने तिचे वडील अनिल मेहता यांना गमावले. वडिलांच्या जाण्याने मलायका व तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर अभिनेत्री कुटुंबाला वेळ देत कामापासून दूर राहिली. अभिनेत्रीच्या वडिलांनी घराच्या बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. मात्र, आता मलायका कामावर परतली आहे. अभिनेत्रीने परतल्यानंतर, नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी तिने तिला झालेला पश्चात्ताप आणि तिच्या निवडीबद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे लोकांना असे वाटले की, अभिनेत्री अर्जुन कपूरकडे बोट दाखवत आहे.
काही काळापूर्वी मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या दोघांनीही यावर उघडपणे काहीही भाष्य केले नाही, परंतु ते सोशल मीडियावर एकमेकांविरोधात गूढ पोस्ट शेअर करत राहिले. यानंतर आता मलायका तिच्या निर्णयांबद्दल आणि निवडीबद्दल बोलली आहे. मलायका ‘ग्लोबल स्पा मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलली आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच पश्चाताप होत असल्याचे म्हणत वैयक्तिक आयुष्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
यावेळी बोलताना मलायका असं म्हणाली की, “मला विश्वास आहे की, मी वैयक्तिक व व्यावसायिकरित्या जी काही निवड केली आहे त्याने माझ्या आयुष्याला आकार दिला आहे. आणि त्यामागे एक कारण आहे. मी कोणतीही खंत न बाळगता जगते आणि मी भाग्यवान समजते की, गोष्टी जशा होत्या तशाच वेळीच समोर आल्या”. मलायकाचे हे वक्तव्य विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत असून नेटकरी यावर अनेक कमेंट करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Video : अरमान मलिक मृत्यूच्या दारातून परत, कारचा टायरच फुटला अन्…; दाखवली भीषण परिस्थिती
मलायका व अर्जुनचे या वर्षाच्या सुरुवातीला ब्रेकअप झाले होते. मलायका अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत न आल्याने चाहते नाराज झाले. एवढेच नाही तर तिने सोशल मीडियावर अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. त्यानंतर अर्जुन कपूर व मलायका एका कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात मलायकाने अर्जुनकडे दुर्लक्ष केले. ती त्याला काहीही न बोलता त्याच्या जवळून गेली. त्यानंतर मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी अर्जुन कपूर सर्वप्रथम पोहोचला असल्याचं दिसलं.