भोजपुरी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार विजय खरे यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ७२ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले विजय खरे यांचे रविवारी बंगळुरू येथील कावेरी रुग्णालयात निधन झाले. ‘रईसजादा’ (१९७६), ‘गंगा किनारे मोरा गांव’ (१९८३) आणि ‘हमरा से बिया कारबा’ (२००३) मधून प्रसिद्धीझोतात आलेले विजय खरे आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात कायमचे अजरामर झाले आहेत. (Vijay Khare passed away)
मिळालेल्या माहितीनुसार, विजय खरे हे गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या समस्येने आजारी होते. विजय खरे अनेक दिवसांपासून डायलिसिसवर होते. खरे तर ते पार्किन्सन्सच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते आणि आज त्यांनी बेंगळुरू येथील कावेरी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यान त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती, मात्र अचानक त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि डॉक्टरांनी खूप प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर १५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आणखी वाचा – Pushpa 2 प्रीमियरला जखमी झालेल्या मुलाची प्रकृती अजूनही गंभीर, काय म्हणाले डॉक्टर?
विजय खरे यांनी २०० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले होते. ते विशेषतः खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. रवी किशन, मनोज तिवारी आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांसारख्या जवळपास प्रत्येक मोठ्या भोजपुरी स्टारसोबत त्यांनी काम केले होते. विजय भोजपुरी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणास्थान होते. ते मुंबईत विजय खरे अकादमी नावाची शाळा चालवायचे. २०१९ मध्ये, भोजपुरी चित्रपटांमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विजय खरे यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
आणखी वाचा – Video : भजन, आरती अन्…; दत्तगुरुंच्या सेवेत रमली जुई गडकरी, घरातील दत्त जयंती उत्सवाचा खास व्हिडीओ केला शेअर
दरम्यान, विजय खरे यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी २ वाजता बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय खरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या मुझफ्फरपूर मधील पोखरिया येथील निवासस्थानी त्यांचे नातेवाईक आणि चाहत्यांची गर्दी झाली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक चाहत्यांनी व भोजपुरी मनोरंजन सृष्टीटील अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.