शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचा नवा चित्रपट येणार, खुलासा करत म्हणाला, “या चित्रपटासाठी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 18, 2023 | 2:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prithvik Pratap new Film

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापचा नवा चित्रपट येणार, खुलासा करत म्हणाला, "या चित्रपटासाठी..."

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. देश-विदेशात हा कार्यक्रम आवर्जून पहिला जात असून कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांची एक वेगळीच फॅन फॉलोविंग आहे. हास्यजत्रेतील विनोदवीरांची स्वतःची वेगळी ओळख बनली असून यातील अनेक कलाकार मोठ्या पडद्यावरदेखील झळकले आहेत. असाच एक अभिनेता आज विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचा आवडता बनला आहे. तो अभिनेता म्हणजे, पृथ्वीक प्रताप. (Prithvik Pratap new Film)

एकांकिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पृथ्वीकने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘क्लास ऑफ ८३’ या वेबसीरिजमध्ये तो झळकला आहे. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे. हास्यजत्रेमध्ये पृथ्वीकने अनेक व्यक्तिरेखा साकारल्या असून त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

हास्यजत्रेतील हाच विनोदवीर आपल्याला लवकरच “डिलिवरी बॉय” या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता प्रथमेश परबसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘फक्त मराठी सिने सन्मान’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर पृथ्वीकने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना याचा खुलासा केला आहे.

हे देखील वाचा – Video : बाप्पाच्या आगमनासाठी ‘ठरलं तर मग’च्या संपूर्ण टीमची जोरदार तयारी, जुईने बनवले खास मोदक

पृथ्वीकला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारलं असता तो म्हणाला, “हास्यजत्रा तर आहेच, पण ते आयुष्यभर असणारच आहे तुम्हा सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठीसुद्धा. पण याचबरोबर माझा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याचं नाव आहे ‘डिलिवरी बॉय’. ज्यात मी आणि प्रथमेश परब असणार आहोत. या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत, कारण चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं असून फक्त डबिंग बाकी आहे. आम्ही खूप उत्सुक आहोत की, कधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आम्ही घेऊन येऊ आणि प्रेक्षकांना सुद्धा तो आवडेल.”

हे देखील वाचा – “आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, भारताने आशियाई चषक जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवची मजेशीर पोस्ट चर्चेत

पृथ्वीकचा या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली असून त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पृथ्वीकच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.

Tags: maharashtrachi hasyajatraprithvik pratapPrithvik Pratap new Film
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
shivali parab told her memories about ganpati

"आधी चाळीत राहायचे तेव्हा…", गणेशोत्सवाबाबत बोलताना शिवाली परबला आठवलं चाळीतलं घर, म्हणाली, "रात्रीचं मंडपात थांबणं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.