मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचं जस घट्ट नातं आहे तसेच एक घट्ट नातं या व इंडस्ट्री मधील कलाकारांचं देखील होत ते म्हणजे अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील. अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आज चित्रपट जगतात त्या नसल्या तरीही त्याची आठवन येते ते त्यांच्या मुलाकडे म्हणजेच अभिनेता प्रतीक बब्बरकडे बघून.(Prateik Babbar New Name)
स्मिता आणि राज यांच्या मुलाने म्हणजेच अभिनेता प्रतीक ने आईच्या आठवणीत भावुक होऊन आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रतिकने त्याच्या नावात महत्वाचा बदल करणार असल्याचं सांगत आहे. आईला श्रद्धांजली म्हणून आज पासून ‘प्रतीक पाटील बब्बर’ असं नाव ठेवणार असल्याच सांगितलं आहे.
कशी होती राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची जोडी(Prateik Babbar New Name)

प्रियकर प्रियासीच्या कोणत्या अदेवर भाळून जाईल सांगता येत नाही असच काहीस झालेलं राज बब्बर यांच्या सोबत एका मुलाखतीत राज यांनी हा किस्सा सांगितलं होता. १९८२ मध्ये दोघांची पहिली भेट ‘भीगी पलकें’ चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघंही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. पण त्यांची पहिली भेट काही खास नव्हती. एका मुलाखतीत राज बब्बर यांनी सांगितलं होतं, “आम्ही त्यावेळी ओडिशाच्या राउरकेलामध्ये शूटिंग करत होतो. शूटिंगच्या वेळीच माझी आणि स्मिताची पहिली भेट झाली. (Prateik Babbar New Name)
या भेटीत सुरुवातीला आम्ही थोडी मजा- मस्ती केली. पण नंतर आमच्यात वादही झाले. ती रागात मला काही बोलली होती पण मला तिचे ते शब्द खूप भावले होते. मी तिच्या या रागावर त्याच क्षणी फिदा झालो होतो.”
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्या अभिनयाचा वारसा पुढे प्रतीक बब्बर यांनी चालवला आणि आता फक्त प्रतीक बब्बर नाही तर प्रतीक पाटील बब्बर या नावाने ओळखला जाणार आहे.