अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर यांचा काही दिवसांपूर्वी शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अचानक समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंनी साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यापूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली न देता थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. त्यानंतर त्यांच्या लग्न सोहळ्यातील विविध फोटोंनी व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. पियुष व सुरुची यांच्या लग्न सोहळ्यातील बरेच फोटो चर्चेत राहिले. (Suruchi Adarkar Piyush Ranade)
अचानक समोर आलेल्या या लग्न सोहळ्यातील फोटोंना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. लग्नानंतर पियुष व सुरुची त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. लग्न झाल्यावर कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून दोघेही दोन दिवसांसाठी फिरायला देखील गेले होते. लग्नानंतर सुरुचीने पुन्हा एकदा छोट्या पडदावर कमबॅक केलं तर पियुष ‘काव्यांजली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. पियुष व सुरुची यांच्यामधील प्रेम त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरी व पोस्टवरुन पाहायला मिळत आहे.
अशातच पियुषच्या इंस्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पियुषने बायकोसाठी एक खास पदार्थ बनवला असल्याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओवर नवऱ्याची काम असं त्याने कॅप्शन दिलं आहे. सध्या पियुष बायकोचे लाड करताना दिसत आहे. बायकोसाठी त्यांने डोसा बनवलेला पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवरुन शेअर करत तुझ्या सेवेसाठी असं त्याने म्हटलं आहे.

तर सुरुचीनेही तिच्या इंस्टाग्रामवरुन स्टोरी पोस्ट करत नवऱ्याने बनवलेला खास पदार्थ शेअर केला आहे. “आधीच मी तुझ्यावर या कलेमुळे इंप्रेस झाले होते” असं म्हणत तिने पियुषने बनवलेल्या डोसा, चटणीचा खास फोटो शेअर केला आहे. पियुष व सुरुची दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. दरम्यान पियुष उत्तम शेफ आहे असं सुरुचीने याआधी बऱ्याच मुलाखतींद्वारे सांगितलं आहे. सध्या पियुष व सुरुची त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत.