महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने आणि कार्यक्रमातील कलाकारांनी आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार हे लोकप्रिय आहेतच. अभिनेत्री नम्रता संभेराव हिच्या लॉली या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. नम्रताने तिच्या अभिनय शैलीने आजवर सार्यांना हसवलं आहे. नम्रता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती लेकासोबतचे अनेक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच नम्रताने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट अधिक लक्षवेधी ठरतेय. नम्रताने तिच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाल्याने तिच्या नवर्यासोबतचा फोटो पोस्ट करत पोस्ट लिहिली आहे.(Namrata Sambherao Special Post)
पाहा काय म्हणाली नम्रता (Namrata Sambherao Special Post)
नम्रताने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘जुळले रे नाते अतूट झाली जन्मजन्मांची भेट घेऊनिया प्रीतीची आण एकरूप होतील प्राण’. आज आमच्या लग्नाला आणि सहवासाला 10वर्ष झाली पूर्ण झाली तुझी सोबत अशीच आयुष्यभर राहू दे हीच देवाकडे प्रार्थना माझ्या सुखात तू तुझं सुख मानतोस. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं कि तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतात हे खूप अनमोल आहे हे असंच टिकवून ठेवूया ???? माझ्या कामाबद्दल तुला वाटणारा आदर हा मला खूप ताकद देतो बळ देतो. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नम्रता हल्लीच कुर्रर्रर्र या नाटकांच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत गेली होती, त्यामुळे हास्यजत्रेत सगळेच तिला मिस करत होते. आता मात्र ती अमेरिका दौरा करून परतली असून हास्यजत्रेत धमाकूळ घालायला सज्ज झाली आहे.(Namrata Sambherao Special Post)
हे देखील वाचा – वीणा आणि आशुतोषच्या नात्याचा होणार उलगडा, सुलेखा ताई सांगणार सत्य
नम्रताने आजवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेच आहे मात्र या कार्यक्रमा व्यतिरिक्त नम्रता आपल्याला चित्रपटांमधून ही पाहायला मिळाली. शिवाय ती विशाखा सुभेदार निर्मित कुर्रर्रर्र या नाटकामध्येही झळकली होती. नम्रताची भूमिका असलेला वाळवी हा सिनेमाही प्रचंड गाजला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती. नम्रताच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.