शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या भूमिकेने दिलं ते शब्दांपलीकडचं आहे’ असं म्हणत प्रसाद ओक यांची लक्षवेधी पोस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 13, 2023 | 11:58 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Oak Special Post

Prasad Oak Special Post

काही चित्रपट असे असतात जे पाहिले की प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्या चित्रपटातील भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते. प्रेक्षकही अशा भारदस्त कथानक असलेल्या चित्रपटाला, चित्रपटातील कलाकाराला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. अशातच गेल्या वर्षी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामे करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तो चित्रपट म्हणजे धर्मवीर. असा हा धर्मवीर म्हणत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या चित्रपटाने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या आठवणीत अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे.(Prasad Oak Special Post)

पाहा प्रसाद धर्मवीर चित्रपटासाठी काय म्हणाला (Prasad Oak Special Post)

धर्मवीर या चित्रपटात प्रसादने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका वाखाणण्याजोगी होती. प्रसादने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “धर्मवीर” माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय…!! या भूमिकेने, या चित्रपटाने मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे अत्यंत मनःपूर्वक आभार…!!! आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार…!!!

धर्मवीर – भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो…!!! “दिघे साहेब”… असेच कायम पाठीशी रहा. असं लिहीत त्याने धर्मवीर चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी तयार होतानाच व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.(Prasad Oak Special Post)

हे देखील वाचा – ‘माझं हसू ते तुझे आनंदाश्रू’ नम्रताची नवऱ्यासाठी खास पोस्ट

हे देखील वाचा – वीणा आणि आशुतोषच्या नात्याचा होणार उलगडा, सुलेखा ताई सांगणार सत्य

प्रसाद ओक याची धर्मवीर चित्रपटातील भूमिका लक्षणीय होतीच शिवाय इतर चित्रपटातूनही त्याने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर केली आहे. अभिनेता म्हणून प्रसाद सर्वांचा लाडका आहेच शिवाय तो एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. दिग्दर्शक म्हणून आजवर प्रसादने केलेल्या सगळ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

Tags: cm eknath shindedharmaveerdharmveerdharmveer 2eknath shindeentertainmentits majjamangesh desaimarathi movieprasad oakpravin tardeshrikant shinde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Genelia Deshmukh

दादा वहिनीची IPL डेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.