रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शोभिता धुलिपालाला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 29, 2024 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Naga Chaitanya and actress Sobhita Dhulipala's Haldi ceremony photos viral on social media.

नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला यांच्या हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दाक्षिणात्य कलाकार नागा चैतन्य सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचाही साखरपुडा थाटामाटात संपन्न झाला. त्यांचे फोटो जेव्हा समोर आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ आज, २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये पार पडला. हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Haldi Ceremony)

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हे जोडपे पारंपारिक लूकमध्ये दिसले. नागा चैतन्यच्या नववधू शोभिताने तिच्या हळदी समारंभासाठी दोन पोशाख परिधान केले होते. शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सोन्याच्या दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा खास केला आहे. या फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sobhita (@sobhitad)

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

हळदी समारंभात नागा चैतन्य कुर्ता पायजमामध्ये दिसला. हळदीच्या काही सर्वोत्तम क्षणांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. दोघांच्या लग्नाच्या काही दिवस आधी अशी अफवा पसरली होती की, या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्सला ५० कोटींना विकले होते. मात्र, नागा चैतन्यने या वृत्ताचे खंडन केले आणि ‘झूम’शी साधलेल्या संभाषणात सांगितले की, “ही खोटी बातमी आहे. असा कोणताही करार झालेला नाही”.

आणखी वाचा – मोठी बातमी! शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीची धाड, नवरा राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी कारवाई

दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते.  अशातच आता काही वृत्तानुसार, नागा चैतन्य आणि शोभिता ०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबंधनात अकडणार आहेत.

Tags: Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Haldi CeremonyNaga Chaitanya and Sobhita Dhulipala MarriageSobhita Dhulipala and Naga Chaitanya Haldi Ceremony Photos
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar In A Relation

'देवमाणूस' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, मराठी अभिनेत्रीबरोबर ठरलं लग्न, म्हणाला, "होणारी होम मिनिस्टर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.