अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाली. २०१० साली तिने ‘दबंग’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या चर्चा सुरु होत्या. यावरुन ती चर्चेतदेखील आली होती. ती बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र यावरुन ती ट्रोल झाली तसेच तिच्या लग्नावरुन चर्चादेखील झाली. (mukesh khanna on sonakshi sinha and zaheer iqbal wedding)
सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी जहीरबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर ती पतीबरोबर हनिमूनला गेली. तिने हनिमूनच्या दरम्यानचे काही रोमॅंटिक फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंतीही दर्शवली आहे. सोनाक्षी पतीबरोबर खुश असली तरीही तिच्या लग्नाच्या चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाहीत. तिच्या लग्नाला अजूनही हिंदू-मुस्लिम लग्न, लव्ह जिहाद अशी नावं दिली जात आहेत. या चर्चावरुन तिला अनेक कलाकारांनी पाठिंबाही दिला. आता या मुद्द्यावर ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुकेश यांनी नुकतीच ‘द फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नावर भाष्य करत म्हणाले की, “त्या दोघांनी अचानक लग्न केले नाही. लग्नाआधी त्यांनी सहा-सात वर्ष एकमेकांना डेट केले. एकमेकांच्या सहवासात राहिले, ओळखलं आणि मगच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला”.
पुढे ते म्हणाले की, “सोनाक्षी व झहीर यांचं लग्न लव्ह जिहाद असल्याचं म्हंटलं जात आहे. पण लव्ह जिहाद तेव्हाच होतो जेव्हा एखाद्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. हिंदू-मुसलमान लग्न करु शकत नाहीत का? आमच्या वेळीदेखी अनेक लोकांनी असे केले आहे. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे”.
सोनाक्षी व झहीर यांनी नोंदणी पद्धतीने आणि जवळचे मित्र व नातेवाईक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे लग्न केले. त्यानंतर त्यांनी ग्रँड रिसेप्शनदेखील केले. या सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.