शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२५ वर्षांपूर्वीची इच्छा, बोलायचं राहिलं आणि…; अतुल परचुरेंच्या आठवणीत लोकप्रिय अभिनेते भावुक, म्हणाले, “या जन्मात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 21, 2026 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Milind Gawali On Atul Parchure

२५ वर्षांपूर्वीची इच्छा, बोलायचं राहिलं आणि…; अतुल परचुरेंच्या आठवणीत लोकप्रिय अभिनेते भावुक, म्हणाले, "या जन्मात…"

Milind Gawali On Atul Parchure : बरेचदा कलाकार मंडळी इतर आपल्या सहकलाकाराबाबत मन मोकळं करताना दिसतात. अशातच एक मराठमोळ्या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतलेल्या लोकप्रिय अभिनेत्याच्या आठवणीत केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. अभिनेते मिलिंद गवळी यांनी दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या आठवणीत केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. अभिनयाबरोबरच मिलिंद गवळी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. अशातच आता त्यांनी अतुल परचुरे यांच्या बरोबरचा मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत मिलिंद यांनी शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधणारी आहे.

मिलिंद यांनी अतुलबरोबरचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “कालाय तस्मै नमः अतुल परचुरे यांनी “जोडी नंबर वन” या झी टीव्हीच्या कार्यक्रमासाठी घेतलेला आमच्या मुलाखतीचा व्हिडीओ कुणीतरी मला फॉरवर्ड केला. जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीची ही मुलाखत होती. त्यावेळी चे अतुल बरोबरचे सगळे प्रसंग अगदी काल घडल्याप्रमाणे डोळ्यासमोरुन गेले. अतुलला मी कधीही ‘अतुल’ अशी हाक मारली नाही नेहमी त्याला ‘अतुलनीय’ म्हणायचो, आणि तो होताच तसा अतुलनीय. Incomparable. १४ ऑक्टोबर २०२४ ला अतुल आपल्याला सोडून निघून गेला. अतुल आपल्यात नाही हे अजूनही खरं वाटत नाही. काल-परवापर्यंत आपल्याशी छान गप्पा मारणारा, आपल्याला हसवणारा, आपलं भरभरुन कौतुक करणारा आपला छानसा मित्र, अचानक कायमचा हे जग सोडून निघून जातो, परत कधीही आपण त्याच्याशी बोलू शकणार नाही, परत कधीही आपण त्याला बघू शकणार नाही, आता आपण कधीच त्याच्याबरोबर काम करु शकणार नाही, एकदा मनुष्य निघून गेला की सगळं तिथेच थांबतं, there is a void , complete emptiness. अशी जवळची आणि छान माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा त्यांची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही”.

आणखी वाचा – रसिक वखारकरचा लग्नसोहळा संपन्न; निवेदिता-अशोक सराफ यांची खास हजेरी, लग्नसोहळ्याचे फोटो समोर; लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

पुढे ते म्हणाले, “आपण पण ना असं जगत असतो की आपण आहोत, कायमचे राहणार आहोत, आपल्याकडे खूप वेळ आहे, पण नाही, खरंतर आपण पण पुढे सरकत आहोत, आज आहोत उद्या नसणार आहोत आणि जग काही तुमच्या आमच्या वाचून थांबणार नाही, त्यामुळे जे काही करायचं आहे ते आपल्याला आता, आपले एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटायचं राहून गेला असेल, त्याच्याशी बोलायचं राहिल असेल, तर उद्यावर ढकलू नका, योग्य वेळ आहे आता, आज, अभी”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात राशनचा तुडवडा; रोशन भजनकर-ओमकार राऊत भिडले, ‘बिग बॉस’ देणार पूर्ण घराला शिक्षा?

शेवटी त्यांनी लिहिलं, “अतुल बरोबर पुन्हा काम करायची इच्छा, एकत्र भेटून छान गप्पा मारायची इच्छा, सगळं सगळं राहूनच गेलं. जे आता या जन्मात शक्य नाही. फक्त त्याच्याबरोबरच्या छान आठवणी त्या मात्र कायमस्वरुपी माझ्याजवळ मी असेपर्यंत राहणार आहे. “कालाय तस्मे नमः” त्या काळाला आणि वेळेला वंदन / नमस्कार “. त्यांच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

Tags: atul parchuremarathi actormilind gawali
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
radha patil live In Relationship

"त्याला कसलंच व्यसन नाही", गेल्या तीन वर्षांपासून लिव्हइनमध्ये राहते राधा पाटील, म्हणाली, "आमचा बेडरुम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.