रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याला कसलंच व्यसन नाही”, गेल्या तीन वर्षांपासून लिव्हइनमध्ये राहते राधा पाटील, म्हणाली, “आमचा बेडरुम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 21, 2026 | 12:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
radha patil live In Relationship

"त्याला कसलंच व्यसन नाही", गेल्या तीन वर्षांपासून लिव्हइनमध्ये राहते राधा पाटील, म्हणाली, "आमचा बेडरुम..."

 radha patil live In Relationship : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये नृत्यांगना, लावणी क्वीन राधा पाटीलची एंट्री झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुरुवातीलाच राधा पाटील आणि दीपाली सय्यदमधील वाद चांगलाच चर्चेत आला. पण आता राधा आणि अनुश्री माने यांच्यातील मैत्री घट्ट होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात राधा व अनुश्री यांनी एकमेकांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य शेअर केले आहे. गार्डन एरियामध्ये दोघी बोलत असतात तेव्हा राधाने तिच्या बॉयफ्रेंडबाबत खुलासा केला. राधा गेल्या तीन वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसह लिव्हइन मध्ये राहते. यावेळी राधाने तिच्या बॉयफ्रेंडच नावही घेतलं मात्र टेलीकास्टदरम्यान ते म्यूट करण्यात आलं.

राधा पाटील म्हणाली, “आम्ही २ BHK मध्ये राहतो, आमचा बेडरुम वेगळा आहे आणि बाकी मुलींसाठी वेगळी खोली आहे. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. त्याचा स्वभाव असा आहे ना… मला जरा कोणी काही बोललं तर, तो कोणालाच ठेवणार नाही. त्याला कसलंच व्यसन नाही आहे. तीन वर्षे झाली आता. तो कधीच स्वतःच्या हाताने जेवला नाही. तो नेहमी माझ्याच हाताने जेवला आहे. (मी त्याला भरवते) त्यामुळे आता मला राहून राहून वाटतंय… मी इथे आल्यावर त्याचं काय होत असेल? कसं होत असेल? मुलींची अशी एक इच्छा असते ‘देसी बॉय’ पाहिजे. अगदी तसाच तो आहे”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात राशनचा तुडवडा; रोशन भजनकर-ओमकार राऊत भिडले, ‘बिग बॉस’ देणार पूर्ण घराला शिक्षा?

राधा पुढे म्हणाली, “आता शोमध्ये हे सगळे (अन्य स्पर्धक) मला इतके बोलतात… तो इथे असता तर एवढ्यात मारून वगैरे निघून गेला असता”. यावर अनुश्री राधाला सांगते, “आता मला पण एखादा बॉयफ्रेंड शोध”, राधाच्या बॉयफ्रेंडविषयी ती असंही म्हणते, “मी त्याची फॅन आहे. म्हणजे मी तुझीही फॅन आहे. पण, मला त्याचं अमुक एक गाणं खूप आवडतं”.

आणखी वाचा – २५ वर्षांपूर्वीची इच्छा, बोलायचं राहिलं आणि…; अतुल परचुरेंच्या आठवणीत लोकप्रिय अभिनेते भावुक, म्हणाले, “या जन्मात…”

यावर राधा पुढे म्हणाली, “तुला माहितीये का? आम्ही जेव्हा फिरायला जातो. तेव्हा माझ्याबरोबर कोणी फोटो काढत नाही पण, त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी खूप गर्दी होते. लोक वेडे आहेत त्याच्यासाठी पण, तो माझा हात कधीच सोडत नाही. आता आम्हाला तीन वर्षे झाली… असं कधीच वाटलं नाही की, आमच्यापैकी एकाचं प्रेम तरी कमी झालं आहे कारण, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी खूप ओरडते, चिडचिड करते, तरीही तो सगळं सहन करतो. आता त्याची आठवण आल्यावर मला खूप रडायला येतं”. यानंतर राधाने तिच्या बॉयफ्रेंडचं नावही घेतलं, मात्र एपिसोड टेलिकास्टदरम्यान ते म्युट करण्यात आलं”.

Tags: Bigg Boss Marathi 6radha patilradha patil relation
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss marathi raqesh bapat sister

"'वुमन कार्ड' खेळण्याची ही पहिलीच वेळ…", अनुश्रीच्या आरोपांनंतर राकेश बापटच्या बहिणीचा संताप, म्हणाली, "माझा भाऊ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.