अभिनय क्षेत्रात अखंड कार्यरत असल्यामुळे मनोज यांना हिंदी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व दोन्ही गोष्टी अवगत आहेत. आजपर्यंतचे त्यांचे सर्व चित्रपट, वेब सिरीज मधील त्यांच्या हिंदी भाषेतील प्रभुत्वाने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.पण एका मुलाखती दरम्यान माझ्या मुलीला हिंदी भाषा बोलताच येत नाही अशी खंत व्यक्त केली. पुढे ते म्हणाले माझ्या मुलीला हिंदी बोलता येत नाही मला वाटलेलं माझे चित्रपट बघून तरी तिला हिंदी भाषेत रस निर्माण होईल पण तसे काहीच झालं नाही.(Manoj Bajpayee Daughter)
ज्या शाळेत ती शिकते तिथले शिक्षक सुद्दा तिच्यावर चिडतात, ओरडतात कारण तिला हिंदी बोलताच येत नाही. या बाबतचा एक किस्सा हि त्यांनी सांगितला शाळेत पालक सभेला बोलवून शिक्षकांनी मनोज यांना सांगितलं कि तुमच्या मुलीला पापा का नाम क्या है विचारल्यावर ती ” मेरे पापा” असं नाव सांगते. ही गोष्टी माझ्यासाठी खूप लाजिरवाणी आहे असं मनोज मुलाखतीत म्हणाले.
मनोज यांनी मुली बाबत आणखी एक किस्सा सांगितला त्यांनी सांगितलं मुलीला एकदा चित्रपटाच्या शूटिंगला घेऊन गेलो तिथे तिचे सगळ्यांनी लाड केले पण तिने फक्त टायगरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदी चित्रपट आवडत नाहीत पण कलाकारांना भेटीला मात्र खूप आवडते हे देखील त्यांनी सांगितलं.
हे देखील वाचा – दिग्दर्शक, निर्मात्यांनी शिव्या दिल्या, हाकललं पण आज मानानं घेतलं जात नाव..
काय विशेष आहे मनोज यांचं हिंदी भाषेवरील प्रभुत्व चाहत्यांना त्यांच्याकडे आकर्षित करत मात्र मुलीला हिंदी आणि त्यांचे चैत्यर्पत देखील आवडत नाहीत.(Manoj Bajpayee Daughter)