जगातील सगळ्यात लाडक्या जोड्यांपैकी एक लाडकी जोडी म्हणजे बाप आणि लेक. लेकीचा जन्मापासून ते लेक लग्न होऊन सासरी जाण्यापर्यंतसगळ्याच गोष्टींमध्ये लेकीच्या मागे खंबीर उभा असलेला बाप. लेकीशिवाय कसा राहू शकतो या प्रश्नच उत्तर अजून कोणत्याही बापाला सापडललेल नसावं. लहानपणी अंग खांद्यावर खेळलेली लेक तिच्या सोयाबीत केलेली मस्ती ही नंतर आठवून सुख देणारी असते. आठवणींच्या पेठाऱ्यात अशाच काही आठवणी भरून घेण्यात व्यस्त झालेत वाघमारे बापलेक. म्हणजेच अभिनेता कैलाश वाघमारे आणि त्यांची लहान लेक यारा.(Kailash Yara Funny Video)

कैलाशने एक मजेदार व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर केला आहे. ज्या व्हिडिओ मध्ये यारा त्याला आणि स्वतःला प्रचंड पावडर लावताना दिसते. आपल्या नटखट अंदाजात वादळीणचा मेकअप करतांना यारा सुंदर दिसते. प्रेक्षकांनी देखील या व्हिडिओ वर किती सुंदर म्हणाल प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकच काय तर इतर कलाकारांना देखील याराच्या या मजेशीर व्हिडिओची भुरळ पडलेली दिसते.

तान्हाजी द अंसन्ग ओरिअर या बहुचर्चित चित्रपटात कैलास ने भूमिका साकारली आहे तर सोबतच अनेक मराठी चित्रपटांमधून नाटकांमधून देखील कैलाश ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(Kailash Yara Funny Video)