मंडळी एखाद्या कलाकाराला जेवढी लोकप्रियता मिळते त्याचसोबत अनेक घटनांना सामोरं देखील जावं लागत. लोकप्रियतेच्या यादीत सुमार असलेला अभिनेता अभिषेक बच्चनला देखील प्रेक्षकांच्या टीकेला सामोरं जावं लागली पण अभिषेक ने देखिल या टीकेला उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय.(Abhishek bacchan troll)
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी चित्रपट सृष्टीत सक्रिय सहभागी आहेत. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळते. नुकताच ऐश्वर्याचा पोन्नियिन सेलवन 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यासाठी अभिषेक ने ट्विट करत करत तिला शुभेच्छा दिल्या. पण अभिषेकच्या या ट्विट वर एका चाहत्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिषेक ने ट्विट करत चित्रपटाचं कौतुक करत एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘या चित्रपटाचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. चित्रपटाची टीम, कास्ट आणि क्रूचे अभिनंदन. माझी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा मला अभिमान वाटत आहे.’
पण अभिषेकच्या या ट्विट वर एका चाहत्याने ‘तुला तिचा अभिमान वाटलाच पाहिजे. तिला अजून चित्रपट साईन करुन दे आणि तू आराध्याची काळजी घे’ अशी मिश्किल कमेंट केली.(Abhishek bacchan troll)
हे देखील वाचा- ‘म्हणून रिअल लाईफ धडाकेबाज होता लक्ष्या…’फायरिंगचा सिन पण हातातच झाला गोळीचा स्फोट, रक्तबंबाळ हाताने दिला परफेक्ट शॉट

या ट्विटला रिप्लाय करत अभिषेक ने चांगलंच उत्तर दिलं आहे ट्विट करत अभिषेक म्हणाला ‘ ‘तिला चित्रपट साईन करु दे? सर, तिला एखादी गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची काहीच गरज नाहीये. विशेषतः जेव्हा तिच्या आवडीचं काम ती करत असेल, तेव्हा तिला ते काम करण्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाहीये.’
मित्राच्या, बायकोच्या , वडिलांच्या कोणाच्याहीची कमला प्रोत्साहन देण्याचं काम करणं यात काही चूक नसावं.