गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सफाई कर्मचाऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, “अशी असंख्य माणसं…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 26, 2024 | 2:35 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Jitendra Joshi shared video of cleaning worker and wish for Republic Day

सफाई कर्मचाऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, “अशी असंख्य माणसं...”

देश उभारणी वा देशाच्या विकासकामांत सैनिक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांचे जितके योगदान असते. तितकेच या देशात काम करणारा मजुर, कामगार, सफाई कर्मचारीदेखील देशाच्या विकासात आपले योगदान देत असतो. मात्र समाजातील या घटकांकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. क्वचितच कुणा एखाद्याचे लक्ष या घटकांकडे जाते आणि असेच एकाचे लक्ष एका सफाई कर्मचाऱ्याकडे गेले आणि तो एक म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी.

आज २६ जानेवारी, स्वतंत्र देशाचा ७५वा प्रजासत्ताक दिन आणि आजच्या या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यभरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये आज झेंडावंदन केले जाते. यानिमित्त सर्व शाळा परिसर स्वच्छ केला जातो. अशीच एक शाळा स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगाराला जितेंद्र जोशी या अभिनेत्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

जितेंद्र जोशी हा अभिनेता असण्याबरोबच एक सामाजिक जाण जाणणारा सजग नागरीकदेखील आहे. जितेंद्र हा नेहमीच त्याच्या समाजाविषयीच्या जाणिवा व्यक्त करत असतो. अशातच त्याने २६ जानेवारीनिमित्त साफसफाई कर्मचाऱ्याप्रती त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्रने साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा – प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची कन्या व पार्श्वगायिका भवतारिणी यांचे निधन, वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

आणखी वाचा – “कलाकार इतरांना आनंद देतो पण…”, आयुष्यातील एकाकीपणावर प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न, म्हणाली, “पुढे जाण्यासाठी…”

जितेंद्र जोशीने पुण्याच्या एका शाळेतील सफाई करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पहाटे ती व्यक्ती शाळेच्या आजूबाजूचा परिसर साफ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्रने असं म्हटलं आहे की, “सकाळी ५.३० वाजता ही व्यक्ती शाळा तयार करते आहे. विद्येने बुध्दी प्राप्त होते आणि ज्ञान संपादन करता येतं. खरं ज्ञान हे की अशी असंख्य माणसं आपल्या कळत नकळत कार्यरत असतात. आपल्यासाठी काम करत असतात. त्यांची आपण दखल घ्यावी आणि त्यांच्यावर प्रेम करावं. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”. दरम्यान, जितेंद्रने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स् व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “समाजात यांचे योगदान फारच महत्त्वाचे आहे, त्यांच्याकडे फार कुणाचं लक्ष जात नाही, पण तुम्ही त्यांना तुमच्या कॅमेऱ्यात टिपलंत, यासाठी तुम्हाला धन्यवाद”. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत

Tags: entertainment newsjitendra joshimarathi actormarathi entertainment newsMarathi newsजितेंद्र जोशीमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, अखेर अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : मैत्री निभावण्यासाठी करण कुंद्राची 'बिग बॉस'च्या घरात एंट्री, मुन्नवरला सपोर्ट करताच झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला, "धर्माच्या नावाखाली तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.