Bigg Boss 17 Latest News : बिग बॉस १७ हा रिऍलिटी शो सध्या रंजक वळणावर आला आहे. या शोचा फिनाले जवळ आला असून टॉप पाच स्पर्धकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी काही कलाकार मंडळी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये येणार आहेत. ‘बिग बॉस’च्या या भागात पाच सेलिब्रिटी या दाखल होणार आहेत आणि त्यांची नावेही समोर आली आहेत. टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेता व बिग बॉस १५ फेम करण कुंद्रा सलमान खानच्या शोचा सर्वात शक्तिशाली स्पर्धक मुन्नवर फारुकीला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे .
मात्र करण कुंद्राने मुन्नवरला पाठिंबा दिल्याबद्दल नेटकरी त्याला वाईटरित्या ट्रोल करताना दिसत आहेत. धर्मावरून ट्रोल झाल्यानंतर करणने आता ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलेलंही आहे. करण कुंद्रा मुन्नवर फारुकीला सपोर्ट करण्यासाठी घरात येणार असल्याची बातमी समोर आली. करण व मुन्नावर दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीसाठी करण शोमध्ये मुन्नवरला सपोर्ट करताना दिसणार आहे. पण करणच्या शोमध्ये मुन्नवरला सपोर्ट केल्यानंतर लोकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Dharam – Adharam ki baatein Twitter pe pelne waalon: Kundrra apna Dharam ache se samajhta hai issliye diye waade pe khadda hai!! Mere dharam ne mujhe yahi sikhaya hai aur jiss dharam ki aad mein apna propaganda chala rahe ho.. neutral audience woh bhi dekh rahi hai toh chinta mat…
— Karan Kundrra (@kkundrra) January 25, 2024
करण कुंद्राने ट्विटद्वारे ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्याने ट्विटमध्ये लिहिले की, “जे लोक ट्विटरवर धर्म व अधर्माविषयी बोलतात. कुंद्राला त्याचा धर्म चांगला समजतो, तो दिलेल्या वचनावर ठाम आहे, माझ्या धर्माने मला हेच शिकवले आहे आणि तटस्थ प्रेक्षक कोणत्या धर्माच्या नावाखाली तुम्ही तुमचा प्रचार करत आहात तेही बघत आहेत, त्यामुळे काळजी करु नका. स्वत:चे डोकं चालवा”. करणचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.
‘बिग बॉस १७’ च्या नुकत्याच समोर आलेल्या भागात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या ‘बिग बॉस’च्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी येणार आहेत. यांत पूजा भट्ट मन्नाराला, शालिन भानोत अभिषेक कुमारला, संदीप सिकंद अरुण माशेट्टीला आणि अमृता खानविलकर अंकिता लोखंडेला सपोर्ट करताना दिसेल.