अष्टपैलू व्यक्तिमत्तव म्हणून हेमंत ढोमे याच्याकडे पाहिलं जात. अभिनयापलीकडे लेखन, दिग्दर्शन क्षेत्रातही हेमंतने चांगलच जम बसवला आहे. कॉलेजमध्ये असताना हेमंत अनेक नाट्य स्पर्धा करायचा.त्यातूनच त्याच्यातला अभिनेता,लेखक घडत गेला.त्यानंतर त्याने व्यावसायिक नाटक देखील केली. नाटकांनंतर क्षणभर विश्रांती हा हेमंतचा पहिला चित्रपट होता. त्यात सचित पाटील, कादंबरी कदम,सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत असे अनेक कलाकार आहेत.या चित्रपटानंतर चोरीचा मामला, पोश्टर गर्ल, बस स्टॉप,हिरकणी अशा अनेक चित्रपटात तो अभिनेता म्हणून पाहायला मिळाला. तसेच हेमंत त्याच्या विनोदी अंदाजासाठी जास्त ओळखला जातो. फु बाई फु मध्ये देखील हेमंत स्पर्धक म्हणून सहभागी होता.(Hemant Dhome)
हेमंतला सुरवातीपासूनच दिग्दर्शन आणि लेखनाची आवड होती.अभिनयात जम बसल्या नंतर, २०१९ मध्ये हेमंतने ये रे ये रे पैसे २ हा चित्रपट दिगदर्शित केला. प्रेक्षकांचा भरघोस मनोरंजन करण्यात या चित्रपटाला यश आले. त्या नंतर त्याच्या झिम्मा या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हेमंतनेच केले.यात त्याने अभिनय देखील केला आहे. वेगळा विषय, सिनेसृष्टीतील वेगवगळ्या वयोगटातील अभिनेत्री आणि परदेशात शूट असा वेगळंच समीकरण झिम्मा मध्ये पाहायला मिळत. त्या नंतर सनी, सातारचा सलमान असे पाठोपाठ सिनेमे हेमंतने दिग्दर्शित केले आहेत.
पहा हेमंतने काय विनंती केली ? (Hemant Dhome)
याच संदर्भांत एका मुलाखतीत हेमंतला विचारले की मागच्या काही वर्षात दिग्दर्शन लेखन करताना अभिनेता मागे पडतोय का त्या वर हेमंतने असे उत्तर दिले की, या निमित्ताने मी माझ्या दिगदर्शक मित्रांना विनंती करेन,की मला फोन करा, एखाद्या चित्रपटासाठी विचारा, मी वजन कमी करेन आणि मग आपण काम करू. हेमंतला अभिनेता म्हणून पहायला कायमच प्रेक्षकांना आवडते.(Hemant Dhome)

या व्यतिरिक्त हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग हे पती-पत्नी आहेत.क्षितीने अनेक मराठी मालिका, हिंदी मालिका, चित्रपट, नाटक यांमध्ये काम केले आहे. तसेच झिम्मा मध्ये देखील क्षिती मुख्य भूमिकांमध्ये पहायला मिळाली.तसेच हेमंत आणि क्षिती त्यांच्या सोशल मीडिया वरही बरेच सक्रिय असतात. ते एकमेकांसोबतचे अनेक फोटोज, व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत असतात.त्यांचे चाहते देखील त्यांच्या या पोस्ट वर त्यांना प्रतिक्रिया देत असतात.